मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता, सखल भागात तुरळक पाणी साचले

गोंदिया जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे.

मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता, सखल भागात तुरळक पाणी साचले
rain update
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 07, 2023 | 11:21 AM

मुंबई : मुंबईत (maharashtra mumabai rain update) मागच्या आठ दिवसांपासून हलक्या व मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी सुरु आहेत. काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून मुसळधार (heavy rain) पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी सखल भागात पाणी सुध्दा साजले आहे. वसई विरार आणि नालासोपारा भागात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. त्या परिसरात जिथं सकळ भाग आहे, अशा ठिकाणी पाणी साचलं आहे. तिथली वाहतूक व्यवस्थित सुरु आहे. त्याचबरोबर पावसाचा लोकल ट्रेन वर कोणताही परिणाम नसून विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते विरार (viral to churchgate local train) लोकल सेवा सुरळीत चालू आहे.

वाशिम जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या दमदार पावसानंतर आता पेरण्यांना वेग आला आहे. बळीराजा पारंपारिक तिफणीसह ट्रॅक्टरने पेरणी करताना दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात शेतकरी सगळ्यात जास्त सोयाबीनचे उत्पादन घेतात. सोयाबीनच्या पेरणीसाठी 15 ते 20 दिवस उशीर झाला आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

गोंदिया जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे.

नंदुरबार जिल्ह्यात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई करावी लागली आहे.

नांदेडमध्ये पावसाच्या हजेरीनंतर आता शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पेरणीला वेग आला आहे. उशिराने आलेल्या पावसाने आता शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केल्याचे चित्र शिवारात पाहायला मिळतंय.

धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे. या पावसामुळे पेरण्यांना वेग मिळणार आहे. जिल्ह्यात तीन लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर ते पेरणे खोळंबल्या होत्या. जुलै महिना आला तरी पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्याची चिंता दूर झाली आहे. 24 तासांमध्ये जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे लागवड झालेल्या पिकांना जीवदान मिळालेले आहे.