AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश काय ?

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पंचनामा करण्याचे निर्देश दिले असून लवकर मदत जाहीर केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश काय ?
Image Credit source: Google
| Updated on: Mar 07, 2023 | 2:20 PM
Share

मुंबई : राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे ( Farmer News ) मोठे नुकसान झाले आहे. रब्बीच्या पिके अक्षरशः भुईसपाट झाले आहे. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. त्यामध्ये सरकारी मदतीची अपेक्षा असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी दखल घेतली आहे. नुकतीच जिल्हाधिकारी यांच्याशी ऑनलाइन संवाद साधून तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले आहे. मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे आणि पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून स्थानिक पातळीवर तयारी केली जात आहे.

ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.

मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.

खरंतर राज्यातील शेतकऱ्यांवर दुसऱ्यांदा हे संकट कोसळले आहे. त्यामध्ये सुरुवातीला खरीप पिकाची दुपार पेरणी त्यानंतर झालेली अतिवृष्टी आणि नंतर आता पुन्हा अवकळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आताही शेतमाल भुईसपाट झाला आहे.

होळी सण साजरा करण्याचा उत्साह एकीकडे असतांना दुसरीकडे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी सर्वच ठिकाणाहून मदतीची मागणी केली जात असतांना सरकारने दखल घेऊन पंचनामा करण्याचे पहिले पाऊल उचलले आहे.

राज्यातील रब्बी पिकांमध्ये गहू हरभरा, कांदा, मका अशी महत्वाची पिकांचा अक्षरशः चिखल झाला आहे. तर द्राक्षबागा संपूर्ण उद्ध्वस्त झाल्या आहेत. जळगाव येथील केळीच्या बागाही जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे बळीराजा ऐन सणासुदीच्या काळात मेटाकुटीला आला आहे.

नाशिक, पालघर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर यांसह विविध भागात गरपीठही झाली आहे. त्यामुळे संपूर्ण पीकच निकामी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी आता सरकार पंचनामा करणार असून शेतकऱ्यांना लवकर मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.