आवक असतानाही नंदुरबारमध्ये मिरचीचे लिलाव बंद, काय आहे कारण ?

| Updated on: Nov 17, 2021 | 1:06 PM

अरबी समुद्रातील हवामानाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम आतापर्यंत पिकांवर झालेला होता. पण आता बाजारपेठांवरही याचा परिणाम दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच मिरचीचे मुख्य आगार मानल्या जाणाऱ्या नंदुरबारमध्ये लाल मिरचीची आवक वाढली होती.

आवक असतानाही नंदुरबारमध्ये मिरचीचे लिलाव बंद, काय आहे कारण ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

नंदुरबार : अरबी समुद्रातील हवामानाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम आतापर्यंत पिकांवर झालेला होता. पण आता बाजारपेठांवरही याचा परिणाम दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच मिरचीचे मुख्य आगार मानल्या जाणाऱ्या नंदुरबारमध्ये लाल मिरचीची आवक वाढली होती. मात्र, आता ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज वर्तवल्याने येथील मिरचीचे लिलाव दोन दिवसांसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी 17 आणि 18 नोव्हेंबर रोजी मिरची विक्रीसाठी आणू नये असे अवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले.

गेल्या 24 तासांमध्ये रत्नागिरीमध्ये 38 मिमी, वेंगुर्ला, नांदेड, सातारा, कोल्हापूर, बारामती, पुणे, सांगलीमध्ये पावसानं हजेरी लावली. तर उर्वरीत राज्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे नंदुरबार बाजार समितीने शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आता कुठे लाल मिरचीची आवक वाढली होती. यंदा उत्पादनात घट झाली असली तरी काढलेली मिरची वाळवली की आव क सुरु होते. त्यानुसारच अडीच हजार क्विंटलची आवक दिवसाकाठी होत होती. मात्र, आता दोन दिवस लिलाव बंद ठेवण्यात आले आहे.

मिरचीचे होते नुकसान

लाल मिरची ही बाजारात आणण्यापूर्वी वाळवली जाते. केवळ एक वेळेस नाही तर अनेक वेळा ऊनामध्ये वाळवावी लागते. तरच या मिरचीला योग्य दर मिळतो. पण आता ढगाळ वातावरण आणि पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे बाजारात अधिकची आवक झाली तर शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे. त्यामुळेच बाजार समितीने दोन दिवस लाल मिरचीचे लिलावच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे जो मिरची उत्पादकांच्या हीताचाही आहे.

परराज्यातूनही लाल मिरचीची आवक

नंदुरबार ही लाल मिरचीची मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना तर याचा फायदा होतोच. शिवाय सीमालगत असणाऱ्या गुजरातहूनही शेतकरी विक्रीसाठी मिरची घेऊन येतात. मात्र, वाहतूकीचा खर्च आणि संभाव्य धोका लक्षात घेता बुधवार आणि गुरुवार येथील लिलाव हे बंद राहणार आहेत. मिरचीची मोठी बाजारपेठ असल्याने नंदुरबारमध्ये अनेक लहान-मोठे प्रक्रिया उद्योगही सुरु झाले आहेत.

अडीच हजाराचा सरासरी दर

यंदा मिरचीला सुरवातीपासूनच चांगला भाव मिळत आहे. सध्या व्हीएनआर, जरेला, फापडा आदी प्रकारच्या मिरच्याची बाजारपेठेत आवक होत आहे. सुमारे अडीच ते तीन हजार क्विंटल मिरची बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. मिरचीला 2 हजार ते 2600 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळत आहेत. परराज्यातील व्यापाऱ्यांही मिरची खरेदी करीत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये मिरची खरेदीसाठी स्पर्धा सुरू झाल्याने किमान तेवढा भाव मिळत आहे, अन्यथा पाचशे ते हजार रुपये क्विंटल मिरचीचे मातीमोल दर शेतकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी मिळाले होते. त्यात खर्चही निघाला नव्हता.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : वीज कंपनीकडून ऊस जळालाय, मग अशी मिळवा नुकसानभरपाई..!

‘एफआरपी’ रकमेचे भिजत घोंगडे, कारखानदारांना केवळ कारवाईचा इशारा

वाढत्या सोयाबीन दराला आता पोल्ट्री धारकांचा विरोध, काय आहेत कारणे?