वाढत्या सोयाबीन दराला आता पोल्ट्री धारकांचा विरोध, काय आहेत कारणे?

गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना ज्याची प्रतिक्षा होती तेच आता प्रत्यक्ष बाजारपेठेत होत आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. आठ दिवसांमध्ये 600 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, वाढत्या दराला आता पोल्ट्री ब्रीडर्सचा विरोध होत आहे.

वाढत्या सोयाबीन दराला आता पोल्ट्री धारकांचा विरोध, काय आहेत कारणे?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 10:38 AM

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना ज्याची प्रतिक्षा होती तेच आता प्रत्यक्ष बाजारपेठेत होत आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच (Soybean Prices) सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. आठ दिवसांमध्ये 600 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, वाढत्या दराला (Poultry Breeders) आता पोल्ट्री ब्रीडर्सचा विरोध होत आहे. एवढेच नाही तर पोल्ट्री धारकांनी या संदर्भात थेट पशूसंवर्धन मंत्री यांनाच निवेदन दिले असून सोयाबीनच्या वाढत्या दरात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. मात्र, याला शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे.

दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत आहे. देशपातळीवरच सोयाबीनला मागणी असल्याने दरात वाढ होत आहे. शिवाय आवक प्रमाणात राहिली तर अणखीन दर वाढतील असेही संकेत व्यापारी देत आहेत. मात्र, वाढत्या दरामुळे कोंबड्याच्या खाद्यपदार्थाच्या दरावर परिणाम होणार असल्याने पोल्ट्री ब्रीडर्स हे विरोध करीत आहेत.

काय आहेत पोल्ट्री ब्रिडर्सच्या निवेदनामध्ये?

सोयाबीनच्या वाढत्या दराचा परिणाम हा पशूखाद्यांच्या दरावर होत आहे. त्यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल 2950 चा हमीभाव आहे. मात्र, सध्या बाजारात सोयाबीनला 6 हजाराचा दर मिळत आहे. त्यामुळे मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही पोल्ट्री धारकांचे नुकसान होत आहे. सोयाबीनला जास्तीत जास्त 4 हजाराचा दर मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्याअनुशंगाने पोल्ट्री ब्रीडर्स यांचा पाठपुरावा सुरु आहे.

शेतकरी संघटनांचा मात्र विरोध कायम

हंगामात प्रथमच सोयाबीनच्या दरात सुधारणा झालेली आहे. सोयाबीनला योग्य दर मिळावा म्हणून शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनची साठवणूक करीत आहे. सोयाबीनच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचा मोठा खर्च झाला आहे. शिवाय मध्यंतरी पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले होते. भर पावसामध्ये सोयाबीनची काढणी आणि मळणीची कामे शेतकऱ्यांनी केलेली आहेत. आता कुठे योग्य प्रमाणात दर मिळत आहे. त्यामुळे पोल्ट्री ब्रीडर्स ना याचे वावडे का आहे ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. शिवाय सोयाबीनच्या दरात आता घट झाली तर आंदोलन उभारणार असल्याचा इशाराही शेतकरी संघटना ह्या देत आहेत.

सोयाबीनचे दर घटले तर सोयापेंडवरही परिणाम

सोयापेंड आयातीच्या संदर्भात पोल्ट्री ब्रीडर्स असोशिएशने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार ऑगस्टमध्ये 12 लाख टन सोयापेंडच्या आयातीला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे सोयाबीनची आवक सुरु होताच त्याच्या दरात घट होणार असा अंदाज बांधण्यात आला आणि तो खराही ठरला होता. सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली होती. सध्या बाजारात सोयाबीनची आवकच होत नसल्याने दरात वाढ होण्यास सुरवात झाली आहे. शेतकऱ्यांनी असाच माल रोखून धरला तर दरात अणखीन वाढ होणार आहे. परिणामी सोयाबीनचे दर वाढले की सोयापेंडचेही दर वाढणार आहेत. त्यामुळेच पोल्ट्री धारक हे सोयाबीनच्या वाढत्या दराला घेऊल परेशान आहेत.

संबंधित बातम्या :

सोयाबीनचे दर वाढले मात्र आवक कमीच, शेतकऱ्यांच्या मनात आहे तरी काय?

खरेदीखत म्हणजे काय? त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे..!

गव्हाचा पेरा झाला अन् ग्राहकही ठरले, औरंगाबादमध्ये अनोखा उपक्रम

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.