पीक नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा ; दिवाळीच्या आगोदर की नंतर ?

| Updated on: Oct 20, 2021 | 11:47 AM

पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी अजूनही (Farmer) शेतकऱ्यांना महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्य सरकारने पहिल्या हप्त्याची रक्कम अदा केली असली तरी केंद्राकडील रक्कम विमा कंपन्याकडे जमा झालेली नाही. आता विमा कंपन्यांनी केंद्राकडे मागणी केली असून रक्कम जमा झाली की ती वितरीत करण्यात येणार आहे.

पीक नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा ; दिवाळीच्या आगोदर की नंतर ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

मुंबई : दिवाळीचा सण तोंडावर आलेला आहे. गावखेड्यात एकच चर्चा आहे ती नुकसानभरपाईची आणि पी.एम.किसान सन्मान योजनेतील रखडलेल्या हप्ताची. (crop insurance ) मात्र, पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी अजूनही (Farmer) शेतकऱ्यांना महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्य सरकारने पहिल्या हप्त्याची रक्कम अदा केली असली तरी केंद्राकडील रक्कम विमा कंपन्याकडे जमा झालेली नाही. आता विमा कंपन्यांनी केंद्राकडे मागणी केली असून रक्कम जमा झाली की ती वितरीत करण्यात येणार आहे.

राज्यात 34 लाख हेक्टरावरील पीकांचे पावसामुळे नुकसान झाले होते तर 20 लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या पुर्वसूचना, विमा कंपनीकडून पंचनामे ही प्रक्रीयाही पार पडली होती. मात्र, विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे निधी वाटपाला विलंब होत आहे. नुकसानीचा आढावा दाखल होताच राज्य सरकारने 973 कोटींचा पहिला हप्ता जमा केला आहे. तर आता केंद्र सरकारही 900 कोटी रुपये विमा कंपनीकडे जमा करणार आहे.

मात्र, राज्य सरकारने विमा हप्ता अदा केल्यानंतर लागलीच विमा कंपनीने केंद्राकडे पैशाची मागणी करणे अपेक्षित होते. परंतू, याला विलंब झाल्याने ही रक्कम दिवाळीचा सण झाल्यावरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यकृषी खात्याच्या पुरवठ्यानंतर आता केंद्र सरकारकडे पैशाची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आता नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा झाला असला तरी दिवाळीनंतरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

राज्यातून 33 लाख 83 हजार शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना

गतमिहन्यात पावसाने खरीपातील पीकांचे मोठे नुकसान झाले होते. मराठवाड्यात तर अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने पीकांची काढणीही करता आलेली नाही. नुकासान झाल्यानंतर अवघ्या 72 तासाच्या आतममध्ये शेतकऱ्यांना नुकसानीच्या पूर्वसूचना ह्या द्यावयाच्या होत्या. त्यानुसार आता विमा कंपन्यांकडे तब्बल 33 लाख 83 हजार पूर्वसूचना प्राप्त झालेल्या आहेत. तर या नुकसानीच्या पोटी राज्य सरकारने पहिल्या हप्त्याची 973 कोटी रुपये विमा कंपन्यांना देऊ केले आहेत. राज्य सरकारने निधी दिल्यानंतर केंद्राकडे पाठपुरवा करणे आवश्यक होते पण विमा कंपन्यांनी याकडे कानडोळा केला होता. आता राज्य कृषी खात्याने पाठपुरवा केल्याने केंद्राचाही निधी मिळणार असून मदतीचा मार्ग हा मोकळा होणार आहे.

पंचमाने झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार लागलीच मदत

पंचनाम्यावरून नुकसानभरपाई ही निश्चित करण्य़ात आलेली आहे. केंद्र सरकारकडे सर्व विमा कंपन्यांनी बिले अदा केलेली आहेत. शिवाय रकमेची मागणी केली असून ही रक्कम विलंब न करता देऊ केली जाते. त्यामुळे पंचनामे होऊन ज्या पध्दतीने नुकसान दाखवण्यात आले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. भरपाईची रक्कम ही निश्चित झालेली आहे. त्यामुळे काही अडचण होणार नसल्याचे कृषी विभागातील विनयकुमार आवटी यांनी सांगितले आहे.

नुकसान भरपाईची प्रक्रिया असते तरी कशी?

1) शेतकऱ्यांनी नुकसानीचे दावे केल्यानंतर पीक विमा कंपनीचे प्रतिनीधी हे महसूल आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांना घेऊन पंचनामे करतात. यासंबंधीचा अहवाल विमा कंपनीला पाठविला जातो.
2) पीक नुकसानीची टक्केवारी ही किती झाली आहे त्यावर मदत घोषीत केली जाते. नुकसानीचा निकष हा एका मंडळासाठी सारखाच असतो. त्या क्षेत्रावरील नुकसान किती आहे. त्याअनुशंगाने विमा कंपन्या ह्या राज्य आणि केंद्र सरकारला अनुदानाची मागणी करतात.
3) पीक विमा कंपन्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली असून राज्याने निधीही सपूर्त केला आहे. मात्र, केंद्र सरकारडे अद्यापही विमा कंपनीने अनुदानाच्या रकमेती मागणीच केलेली नाही. त्यामुळे निधीच मिळालेला नाही. मागणी केलेल्या पैशाची तर लागलीच पूर्तता झाली तर या निधीचे विवरण करावे लागणार ही भिती विमा कंपन्यांमध्ये आहे. त्यामुळे मागणीच करण्यात आलेली नाही. (Crop insurance company stalled compensation, farmers distressed)

संबंधित बातम्या :

औषधी वनस्पतींची शेती, हजारोंची गुंतवणूक अन् लाखोंची कमाई

रब्बीतील मोहरीचे पीक ; पेरणीपासून काढणीपर्यंतचे मार्गदर्शन

हुश्श…! अखेर सणासुदीत का होईना खाद्यतेलाचे दर घटणार ; दिवाळी होणार गोड होणार