AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रब्बीतील मोहरीचे पीक ; पेरणीपासून काढणीपर्यंतचे मार्गदर्शन

सध्या मोहरी पेरणीचा कालावधी असला तरी शेतकऱ्यांनी पेरणीच्या पूर्वी आर्द्रतेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. साधारण: 30 सप्टेंबरपासून ते 20 ऑक्टोंबरपर्यंत मोहरीच्या पेरणीला पोषक वातादरण असते. मात्र, पावसाने किंवा इतर कोणत्या कारणाने पेरणी करता आली नाही तर 10 नोव्हेंबरपर्यंत पेरणी ही करता येते.

रब्बीतील मोहरीचे पीक ; पेरणीपासून काढणीपर्यंतचे मार्गदर्शन
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 6:20 PM
Share

मुंबई : मोहरीच्या पेरणीप्रसंगी एक प्रकारचे वातावरण पोषक असणे आवश्यक आहे. (mustard sowing ) सध्या मोहरी पेरणीचा कालावधी असला तरी शेतकऱ्यांनी पेरणीच्या पूर्वी आर्द्रतेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. (Rabbi Hangam) साधारण: 30 सप्टेंबरपासून ते 20 ऑक्टोंबरपर्यंत मोहरीच्या पेरणीला पोषक वातावरण असते. मात्र, पावसाने किंवा इतर कोणत्या कारणाने पेरणी करता आली नाही तर 10 नोव्हेंबरपर्यंत पेरणी ही करता येते. याकरिता योग्य बियाणाची निवड महत्वाची आहे.

मोहरीच्या लागवड आणि काढणीपर्यंतचे मार्गदर्शन हिरयाणा कृषी विद्यापीठातील डॅा. राम निवास धांडा केले आहे. धांडा यांनी स्पष्ट केले की, मोहरीच्या पेरणीसाठी आरएच-9801 आणि आरएच-30 हे बियाणे पेरले जाऊ शकतात. त्यासाठी शास्त्रज्ञांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. या मार्गदर्शक सुचनांचे पालन केल्यास उत्पादनात वाढ होणार आहे. शेतजमिनीची मशागत आणि जमिनीत ओलावा असल्यास उगवण क्षमता तर वाढतेच शिवाय पीक जोमात येते.

पेरणीपूर्व तयारी

सुधारित वाण मोहरीचे वाण सुधारीत वाण आरएच 725, आरएच 0749, आरएच 30 हे एक चांगले वाण आहे. बागायत क्षेत्र असेल तर एकरी 1.5 किलो बियाणे, जिरायत भागासाठी एकरी 2 किलो याप्रमाणे पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्याला एक किलो बियामागे 2 ग्रॅम कार्बिंडिझम हे मिसळून एकत्र केल्यास उगवण चांगली होते व रोगराईचा प्रादुर्भाव होत नसल्याचे कृषी महाविद्यालयाच्या जनुकीय आणि वनस्पती पुनरुत्पादन विभागाचे अध्यक्ष डॉ. एस. के. पहुजा यांनी सांगितले.

नियोनबध्द पेरणीमुळे वाढणार उत्पादन

दोन्ही रोपातील अंतर हे 10 ते 15 सेंमी असावे तर दोन्ही ओळीतील अंतर हे 30 सेंमी असायला हवे. याशिवाय आरएच 725 आणि आरएच 749 या प्रगत वाणामधील रांगेचे अंतर हे 45 सेंमी असणे गरजेचे आहे. रब्बी हंगामातील मोहरी हे मुख्य पीक आहे. या पिकाची योग्य वाढ करुन शेतकरी कमी खर्चात अधिकचे उत्पादन घेऊ शकतो.

खत किती वापरावे

कोणत्याही पीकावर शेणखताचा हा अनुकूलच परिणाम होतो. त्यामुळे मोहरीची पेरणी करण्यापूर्वी एकरी 6 टन एवढे शेण खत शेतामध्ये टाकणे महत्वाचे असल्याचे मोहरीचे शास्त्रज्ञ यांनी सांगितले आहे. तर 35 किलो डीएपी, 25 किलो युरिया आणि 10 किलो झिंक सल्फेट तसेच 70 किलो युरिया आणि 75 किलो सिंगल सुपरफॉस्फेट हे पेरणीप्रसंगी हा प्रयोग करावा लागणार आहे. पेरणीनंतर पहिले पाणी देताना आणि पीक वाढण्याच्या प्रसंगी अशाचप्रकारे फवारणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होणार आहे. (If mustard crop is cultivated in a planned manner, a lot of production, advice from agronomists)

संबंधित बातम्या :

हुश्श…! अखेर सणासुदीत का होईना खाद्यतेलाचे दर घटणार ; दिवाळी होणार गोड होणार

दुष्काळात तेरावा ! कांदा चाळीतील 90 टन कांदा सडला, काय आहे उपापयोजना ?

मल्चिंग पेपर पीकासाठी संरक्षणाचे कवच, गादीवाफा अन् मल्चिंग पसरवण्याचे यंत्र

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.