Latur : नुकसानीचा पाऊस, वीज कोसळून गायी-म्हशी दगावल्या, फळबागाही आडव्या

| Updated on: May 21, 2022 | 12:12 PM

लातूर जिल्ह्यात सुरवातीच्या दोन दिवसांमध्ये निलंगा आणि औसा तालुक्यातच पावसाने हजेरी लावली होती. आता मात्र, देवणी ,शिरूर-अनंतपाळ ,रेणापूर आणि अहमदपूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागा आता अंतिम टप्प्यात असतानाच झालेल्या पावसामुळे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

Latur : नुकसानीचा पाऊस, वीज कोसळून गायी-म्हशी दगावल्या, फळबागाही आडव्या
Follow us on

लातूर : आतापर्यंत (Unseasonable Rain) अवकाळी पावसाची अवकृपा होती. त्याची जागा आता मान्सूनपूर्व पावसाने घेतली आहे. (Latur District) लातूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून हा पाऊस पेरणीपूर्व मशागतीसाठी फायदेशीर असला तरी मात्र, अचानक झालेल्या (Rain) पावसामुळे फळबागा ह्या आडव्या झाल्या आहेत. तर वीज कोसळल्याने एक गाय आणि सहा म्हशी दगावल्या आहेत. यंदा अपेक्षेपेक्षा आगोदरच पावसाला सुरवात झाली असून शेतकऱ्यांची उन्हाळी पिके अजून शेतामध्येच आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांचा धांदल उडाली असली तरी वीज कोसळल्याने जिल्ह्यात 7 जनावरांना जीव गमवावा लागला आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, बीड आणि लातूर जिल्ह्यातच पावसाने हजेरी लावली आहे. कडाक्याच्य़ा उन्हानंतर पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सर्वकाही बदलून गेले आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन

लातूर जिल्ह्यात सुरवातीच्या दोन दिवसांमध्ये निलंगा आणि औसा तालुक्यातच पावसाने हजेरी लावली होती. आता मात्र, देवणी ,शिरूर-अनंतपाळ ,रेणापूर आणि अहमदपूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागा आता अंतिम टप्प्यात असतानाच झालेल्या पावसामुळे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. किनगाव ते रेणापूर रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे कोलमडून रस्त्यावर पडली आहेत .

वीज कोसळल्याने कडब्याच्या गंजीला आग

रेणापूर तालुक्यातील अनेक गाव शिवारात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. तालुक्यातील फावडेवाडी येथील चार जनावरांच्या गोठ्यांना आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे जनावरांसाठी साठवणूक केलेल्या चाऱ्यावर देखील वीज कोसळल्याने चारा जळून खाक झाला आहे. याशिवाय पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची औजारेही जळून खाक झाली आहेत. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा

जनावरांच्या गोठ्याला आग

दोन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे. शुक्रवारी सायंकाळी तर वादळी वाऱ्यासह नुकसानीचाच पाऊस झाला आहे. यामुळे शेतीकामात अडथळे निर्माण होऊन अनेक प्रश्न उपस्थित राहणार आहेत. रेणापूर तालुक्यातील 1 गायी आणि 6 म्हशी दगावल्या आहेत. पावसाची सुरवात ही दिलासादायक असली तरी वादळी वाऱ्यामुळे हा पाऊस नुकसानीचा ठरत आहे. चारापिके आणि फळबागांचे मोठे नुकसान होत आहे.