Wardha : पालकमंत्र्याचा दरबार अन् शेतकऱ्यांना मिळाला हातबार, शेतशिवार होणार आता हिरवागार

Wardha : पालकमंत्र्याचा दरबार अन् शेतकऱ्यांना मिळाला हातबार, शेतशिवार होणार आता हिरवागार
Image Credit source: TV9 Marathi

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत या पाझर तलावातील गाळ काढण्याची कार्यवाही लघु सिंचन विभागाच्यावतीने केली जात आहे. बजाज फाऊंडेशनच्यावतीने यंत्राद्वारे गाळ काढून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर टाकूण दिला जातो. शेतकरी नंतर तो सुपीक गाळ आपल्या शेतात टाकतात. यामुळे उत्पादनात वाढ होईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.

चेतन व्यास

| Edited By: राजेंद्र खराडे

May 21, 2022 | 11:29 AM

वर्धा : नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री सुनील केदार यांचा (Zilha Parishad) जिल्हा परिषदेच्या सभागृहात जनता दरबार घेतला जातो. याच दरबारात शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. देवळी तालुक्यातील कोल्हापुर (Pazar Lake) पाझर तलावात गाळ साचल्याने तो काढण्यात यावा आणि हा गाळ लगतच्या शेतकऱ्यांना विनामुल्य उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी या दरबारात करण्यात आली होती. या मागणीची तातडीने दखल घेत गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. शेतकऱ्यांना हा गाळ (Free) विनामुल्य मिळणार असल्याने शेतजमिनीचा कस वाढणार असून उत्पदनात वाढ होणार आहे.

सुपिक गाळामुळे उत्पादनात वाढ

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत या पाझर तलावातील गाळ काढण्याची कार्यवाही लघु सिंचन विभागाच्यावतीने केली जात आहे. बजाज फाऊंडेशनच्यावतीने यंत्राद्वारे गाळ काढून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर टाकूण दिला जातो. शेतकरी नंतर तो सुपीक गाळ आपल्या शेतात टाकतात. यामुळे उत्पादनात वाढ होईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. या गाळामुळे जमिनीचा कस वाढतो शिवाय तणविरहीत पीक येत असल्याने शेतकऱ्यांचे परिश्रमही कमी होणार आहेत. उत्पादनावर खर्च कमी आणि उत्पन्न अधिक असा दुहेरी उद्देश साधला जाणार आहे.

कोल्हापूरी तलावातून गाळ उपसा

देवळा तालुक्यातील सात ते आठ गावातील शेतकऱ्यांना या सुपीक गाळाचा लाभ होत आहे. सदर तलावातून 12 हजार घनमिटर गाळाचा उपसा होणार आहे. यामुळे तलाव अधिक क्षमतेते भरणार असून त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होईल. शिवाय सुपीक गाळ शेतात टाकण्यासाठी उपलब्ध झाल्याने शेताची सुपिकता देखील वाढणार आहे. विशेषत: शेतकऱ्यांना या गाळासाठी एक पैसाही मोजावा लागणार नाही. केवळ वाहतूकीचा खर्च करुन गाळ शेतामध्ये टाकून घेता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

असा हा दुहेरी फायदा

कोल्हापूर पाझर तलावातील गाळ काढणी झाल्याने ह्या तलावाची साठवणूक क्षमता वाढणार आहे. पाण्याचा अधिक साठा झाल्याने या भागातील विहिरींच्या पाणी पातळीतही वाढणार आहे. गेल्या अनेक दिवासांपासून तलाावात गाळ साठून राहिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण हंगाम नव्हे तर अवघ्या काही दिवसांमध्ये हा तलाव तळाला जात आहे. मात्र, आता साठवण क्षमता वाढणार आहे तर दुसरीकडे सुपिक गाळामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें