व्हॅलेंटाईनला गुलाबासोबत चालून आली ‘लक्ष्मी’, पुण्यातल्या मावळ प्रांतात शेतकऱ्यांना गणित परफेक्ट जमलं!

| Updated on: Feb 15, 2022 | 11:03 AM

कोरोनाने ओढावलेल्या परस्थितीचा परिणाम सर्वंच घटकांवर झाला होता. यामुळे गेल्या दोन वर्षात सणही उत्सवात साजरे केले जात नव्हते तिथे व्हॅलेंटाईनचे काय? त्यामुळे गुलाब फुलांच्या मागणीत मोठी घट झाली होती. देशाअंतर्गत बाजारपेठेत उठाव नव्हताच तर निर्यातही बंद होती. त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते.

व्हॅलेंटाईनला गुलाबासोबत चालून आली लक्ष्मी, पुण्यातल्या मावळ प्रांतात शेतकऱ्यांना गणित परफेक्ट जमलं!
'व्हॅलेंटाईन डे' च्या निमित्ताने गुलाबला चांगलीच मागणी होती. त्यामुले मावळच्या शेतकऱ्यांना अधिकचा फायदा झाला आहे.
Follow us on

मावळ : कोरोनाने ओढावलेल्या परस्थितीचा परिणाम सर्वंच घटकांवर झाला होता. यामुळे गेल्या दोन वर्षात सणही उत्सवात साजरे केले जात नव्हते तिथे व्हॅलेंटाईनचे काय? त्यामुळे (Rose) गुलाब फुलांच्या मागणीत मोठी घट झाली होती. देशाअंतर्गत बाजारपेठेत उठाव नव्हताच तर (Rose flower Export) निर्यातही बंद होती. त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. हे कमी म्हणून की यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. मात्र, या (Natural Hazards) नैसर्गिक संकटावर गुलाब उत्पादक शेतकऱ्यांनी मात केली आहे. गेल्या दोन वर्षाच्या नुकसानीनंतर यंदा व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने गुलाबची मोठ्या प्रमाणात निर्यात झाली आहे. त्यामुले मावळच्या गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिकूल परस्थितीमध्येही सुगीचे दिवस आले आहेत. निमित्त व्हॅलेंटाईनचे का असेना पण शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडली याचे महत्व अधिक आहे.

40 ते 45 कोटींची उलाढाल

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी गुलाब फुलाला महत्व असते. या दिवसाचेचे मुहूर्त साधून मावळच्या प्रांतातल्या शेतकऱ्यांनी गुलाबाची जोपासणा केली होती. योग्य नियोजन आणि परिश्रमाच्या जोरावर गेल्या दोन वर्षात झालेले नुकसान भरुन काढण्याचा शेतकऱ्यांचा मानस होता. त्याच अनुशंगाने गुलाबाची निर्यात करण्यात आली आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ साठी मावळ मधून परदेशात सुमारे एक कोटी तर देशांतर्गत बाजारपेठेत सुमारे दीड कोटी अशी एकूण अडीच कोटी गुलाबाची फुले विक्रीसाठी पाठवण्यात आलीय व त्यातून तब्बल 40 ते 45 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

स्थानिक बाजारपेठेचाच मोठा आधार

‘व्हॅलेंटाईन डे’ मुळे परदेशातूनही गुलाब फुलांची मागणी होते. त्यानुसार यंदा मावळमधून 1 कोटी गुलाब फुलांची निर्यात करण्यात आली आहे. मात्र, दराचा विचार केला तर स्थानिक बाजारपेठच सरस ठरत आहे. कारण निर्यात करण्यात आलेल्या गुलाबाला 13 ते 14 रुपये प्रति नग असा दर आहे तर स्थानिक बाजारपेठेत एका गुलाबाला 15 ते 16 रुपये मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र, गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे गुलाब मागणीमध्ये निम्म्याहून अधिकची घट झाली होती. यंदा प्रादुर्भाव कमी होताच मागणी वाढली असून दरही चांगला मिळाला अन् शेतकऱ्यांना याचा फायदाही अधिक प्रमाणात झाला आहे.

संबंधित बातम्या :

धक्कादायक! साईबाबांच्या शिर्डीवर दहशतवाद्यांचा डोळा, दुबईतून अटक केलेल्या अतिरेक्यांकडून खळबळजनक कबुली

Kharif Season: सोयाबीन, कापसाप्रमाणेच तुरीचीही अवस्था, योग्य दरासाठी ‘एका’ निर्णयाची आवश्यकता..!

जालन्याच्या मोसंबीला किसान रेल्वेचे ‘इंजिन’, क्षेत्रही वाढले अन् शेतकऱ्यांचे उत्पन्नही