AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्याच्या मोसंबीला किसान रेल्वेचे ‘इंजिन’, क्षेत्रही वाढले अन् शेतकऱ्यांचे उत्पन्नही

उत्पादित झालेल्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ मिळाली तर उत्पादनात दुप्पट वाढ होते. मराठवाड्यातील जालना जिल्ह्याची ओळख ही मोसंबीचा जिल्हा म्हणून आहे. येथील पोषक वातावरणामुळे मोसंबीची चवच न्यारी असल्यामुळे महाराष्ट्रासह परराज्यातून मागणी असते. मोसंबीला योग्य बाजारपेठेची गरज असल्याचे ओळखून सुरु करण्यात आलेल्या किसान रेल्वेचा खरा अर्थांने येथील शेतकऱ्यांना उपयोग होऊ लागला आहे.

जालन्याच्या मोसंबीला किसान रेल्वेचे 'इंजिन', क्षेत्रही वाढले अन् शेतकऱ्यांचे उत्पन्नही
जालना येथून किसान रेल्वेच्या माध्यमातून मोसंबी मुख्य बाजारपेठेत मार्गस्थ होताना
| Updated on: Feb 15, 2022 | 9:48 AM
Share

जालना : उत्पादित झालेल्या (Agricultural goods) शेतीमालाला योग्य बाजारपेठ मिळाली तर उत्पादनात दुप्पट वाढ होते. मराठवाड्यातील जालना जिल्ह्याची ओळख ही मोसंबीचा जिल्हा म्हणून आहे. येथील ( Nurturing environment) पोषक वातावरणामुळे मोसंबीची चवच न्यारी असल्यामुळे महाराष्ट्रासह परराज्यातून मागणी असते. मोसंबीला योग्य बाजारपेठेची गरज असल्याचे ओळखून सुरु करण्यात आलेल्या (Kisan Railway) किसान रेल्वेचा खरा अर्थांने येथील शेतकऱ्यांना उपयोग होऊ लागला आहे. यंदा तर प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना याची गरजच होती, मात्र, मोसंबीची तोडणी होताच किसान रेल्वे सुरु झाल्याने योग्य बाजारपेठ आणि योग्य वेळी मालाची वाहतूक होऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. यंदाच्या हंगामात जालन्यातून तिसऱ्या किसान रेल्वेत 10 टन मोसंबी ही आगरतळाला मार्गस्थ झाली आहे. या सुविधेमुळे अधिकचा बाजारभाव ज्या मार्केटमध्ये असेल तिथे कमी खर्चात ही मोसंबी पोहचवली जात आहे.

20 हजार हेक्टरावर मोसंबीच्या बागा

मोसंबीच्या उत्पादनासाठी जालना जिल्ह्यातील वातावरण हे पोषक आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे बागांची जोपासणा केली. तब्बल 20 हजार 155 हेक्टरावर मोसंबी आहे. गतवर्षी 1 लाख 34 हजार मेट्रीक टनाचे उत्पादन झाले होते. अशा प्रसंगी योग्य बाजारपेठेसाठी आवश्यकता असते ती बाजारपेठेची. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हीच गरज ओळखून केंद्र सरकारने किसान रेल्वेची सोय येथे केली आहे. कमी खर्चात अधिकची वाहतूक आणि अधिकचा दर असा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

किसान रेल्वेतून 15 टन मोसंबी मुख्य बाजारपेठेत

मोसंबी तोडणीला सुरवात होताच ही सेवा सुरु झाली आहे. 2 जानेवारी रोजी पहिली किसान रेल्वे जिल्ह्यातून मार्गस्थ झाली होती. तर सोमवारी तिसरी रेल्वे ही आगरतळाला मार्गस्थ झाली आहे. दरम्यान, ज्या बाजारपेठेत अधिकचा दर तिथे मोसंबीची विक्री करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळालेली आहे. आगरतळाला ही मोसंबीसाठी मुख्य बाजारपेठ मानली जाते. या बाजारपेठेत अधिकचा दर मिळत असल्याने तिसऱ्या रेल्वेच्या माध्यमातून 15 टन मोसंबीची वाहतूक करण्यात आली आहे.

भौगोलिक मानांकनामुळे परराज्यात दीडपट दर

जालना जिल्ह्यात मोसंबीचे क्षेत्र आणि दर्जा ओळखून केंद्र सरकारने भौगोलिक मानांकन दिले आहे. त्यामुळे जालन्याच्या मोसंबीला मोठी मागणी आहे. मराठवाड्यापेक्षा परराज्यात या मोसंबीला अधिकची मागणी आणि अधिकचा दरही आहे. जालना मार्केटमध्ये मोसंबीला 20 ते 27 हजार रुपये प्रतिटन दर आहे. तर आगारतळा येथील बाजारपेठेत 35 हजार रुपये. प्रति टनमागे 8 ते 10 हजाराचा फरक असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होते. त्यामुळेच किसान रेल्वेचे इंजिन हे जालन्याच्या मोसंबीला मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्याचे फार्मा प्रड्यूसर कंपनीचे भास्कर पडूळ यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

नोंदणीपूर्ण होण्यापूर्वीच संपली मुदत, भातखरेदी केंद्रावर सुविधांपेक्षा अडचणी अधिक..!

देशातील कांदा निर्यातीमध्ये महाराष्ट्राची महत्वाची भूमिका, गेल्या 9 वर्षात कसे बदलले कांदा मार्केट?

‘जीआय’ मिळालेल्या फळपिकांमध्ये बनवेगिरी कुणाची? कृषिमंत्र्यांचा काय आहे इशारा?

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...