AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोंदणीपूर्ण होण्यापूर्वीच संपली मुदत, भातखरेदी केंद्रावर सुविधांपेक्षा अडचणी अधिक..!

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळावा म्हणून सरकारच्या माध्यमातून धानखरेदी केंद्र ही सुरु केली जातात. मात्र, प्रत्यक्ष बांधावरची स्थिती न पाहताच केवळ कागदोपत्री नियमांनुसारच खरेदीवर भर दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. धान काढणी झाल्यानंतर आता शासनाने ऑनलाईन भातखरेदी नोंदणीला प्रारंभ केला होता.

नोंदणीपूर्ण होण्यापूर्वीच संपली मुदत, भातखरेदी केंद्रावर सुविधांपेक्षा अडचणी अधिक..!
संग्रहीत छायाचित्र
| Updated on: Feb 15, 2022 | 4:19 AM
Share

सिंधुदुर्ग : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळावा म्हणून सरकारच्या माध्यमातून (Paddy Procurement Centre) धानखरेदी केंद्र ही सुरु केली जातात. मात्र, प्रत्यक्ष बांधावरची स्थिती न पाहताच केवळ कागदोपत्री नियमांनुसारच खरेदीवर भर दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. धान काढणी झाल्यानंतर आता शासनाने (Online Registration) ऑनलाईन भातखरेदी नोंदणीला प्रारंभ केला होता. मात्र, ही मुदत 31 जानेवारी रोजीच संपलेली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची नोंदणी करणे बाकी असतानाच ही प्रक्रिया बंद झाली आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावर सुविधांपेक्षा अडचणी अधिक अशीच अवस्था झाली आहे. (Heavy Rain) यंदा पावसामुळे भात काढणी लांबणीवर पडली होती. येथील स्थितीचा विचार करुन भातखरेदीच्या नोंदणीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी भात उत्पादक शेतकरी करीत आहेत. मात्र, मुदत संपून आता 14 दिवस उलटले आहेत. असे असतानाही राज्य सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

भात उत्पादनात वाढ, त्यामुळे नोंदणीचा प्रश्न

गेल्या काही दिवसांपासून भातशेतीमध्ये अत्याधुनिक यंत्राचा वापर वाढला आहे. शिवाय पाण्याचेही योग्य नियोजन केले जात आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. पूर्वी हेक्टरी 25ते 30 क्विंटल उत्पादन होत होते तेच आता 50 ते 65 क्विंटलवर गेले आहे. उत्पादन वाढले पण नोंदणी प्रक्रियेच्या नियमात कोणतेच बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. ऐन भात काढणीच्या दरम्यानच ही नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली होती म्हणून अनेक शेतकरी हे नोंदणीपासून वंचित राहिलेले आहेत.

आतापर्यंतची काय आहे स्थिती..

भातखरेदी केंद्राच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात 36 हजार क्विंटल भाताची खरेदी झालेली आहे. प्रत्यक्षात अजून 50 हजार क्विटंलची खरेदी होणे बाकी आहे. जर खरेदी केंद्र सुरु राहिली नाहीत तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंत खरेदी नोंदणीची मुदत करण्याची मागणी होत आहे. यापूर्वीच पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले होते. त्यामुळे किमान दरात आणि खरेदीमध्ये तरी सरकारने दिलासा द्यावी अशी मागणी होत आहे.

थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. भाताचे उत्पादन पदरी पडूनही विक्रीचा प्रश्न कायम आहे. उत्पादकांच्या अडचणी सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी कणकवली तालुका खरेदी केंद्राचे अध्यक्ष विठ्ठल देसाई यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाच पत्र पाठवले आहे. 31 मार्च पर्यंत नोंदणीसाठी मुदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

‘जीआय’ मिळालेल्या फळपिकांमध्ये बनवेगिरी कुणाची? कृषिमंत्र्यांचा काय आहे इशारा?

Latur Market: सर्वकाही शेतकऱ्यांच्या मनासारखे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोयाबीनच्या दरात…

Summer Season: यंदा प्रायोगिक तत्त्वावर, आगामी काळात वाढणार उन्हाळी सोयाबीनचे क्षेत्र

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.