AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जीआय’ मिळालेल्या फळपिकांमध्ये बनवेगिरी कुणाची? कृषिमंत्र्यांचा काय आहे इशारा?

भौगोलिक मानांकन मिळालेल्या फळपिकांना एक वेगळा दर्जा आहे. यामुळे जीआय मानांकन मिळालेल्या फळांना चांगला दरही मिळतो त्यामधून शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होते. पण आता यामध्येही बनवेगिरी वाढत आहे. विशेषत: आंबा पिकामध्ये हा प्रकार वाढत आहे. कर्नाटकातील आंबा हा मुंबईमध्ये हापूस या नावाने विकला जातो. त्यामुळे ग्राहकांना अधिकच्या दराचा फटका तर बसतोच

'जीआय' मिळालेल्या फळपिकांमध्ये बनवेगिरी कुणाची? कृषिमंत्र्यांचा काय आहे इशारा?
दादा भुसे
| Updated on: Feb 14, 2022 | 4:27 PM
Share

पुणे : भौगोलिक मानांकन मिळालेल्या फळपिकांना एक वेगळा दर्जा आहे. यामुळे (Geographical Indication) जीआय मानांकन मिळालेल्या फळांना चांगला दरही मिळतो त्यामधून शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होते. पण आता यामध्येही बनवेगिरी वाढत आहे. विशेषत: (Mango Crop) आंबा पिकामध्ये हा प्रकार वाढत आहे. कर्नाटकातील आंबा हा मुंबईमध्ये हापूस या नावाने विकला जातो. त्यामुळे ग्राहकांना अधिकच्या दराचा फटका तर बसतोच. शिवाय जीआय मिळालेल्या फळाबाबत विश्वासही राहत नाही. त्यामुळे असे प्रकार आता खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा (Dada Bhuse) कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. यासंबंधी पणन मंत्र्यांच्या माध्यमातून अशा बनवेगिरीला आळा घालण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता अशा बनवेगिरीवर कसे नियंत्रण मिळवले जाणार हे पहावे लागणार आहे.

वेळप्रसंगी नियमांमध्ये सुधारणा पण कारवाई अटळ

फळपिकांनाही मानांकन मिळाले असल्याचे भासवून त्याची विक्री होत आहे. यामध्ये ऑनलाईन विक्रीमध्ये हा प्रकार वाढत आहे. कर्नाटकातील शेतकऱ्यांकडून मुंबईत अनेक भागात अशाप्रकारे विक्री सुरु आहे. यामुळे ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो. त्यामुळे भौगोलिक मानांकनाच्या नावाखाली इतर शेतीमाल विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दादा भुसे यांनी दिला आहे. वेळप्रसंगी नियमांमध्ये सुधारणा करुन ही कारवाई केली जाणार आहे. तसेच जीआय वाणांची थेट ग्राहकांनाही ओळख पटावी यासाठी जनजागृती केली जाणार आहे. याकरिता एक स्वतंत्र यंत्रणा राबवणार असल्याचेही त्यांनी कृषी अधिकारी यांच्या बैठकी दरम्यान सांगितले आहे.

क्यूआर कोडचा पर्यायही खुला

भौगोलिक मानांकन मिळालेल्या शेतीमालाची ओळख पटवण्यासाठी आता नव्याने क्यूआर कोडचा वापर होऊ लागला आहे. महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीसाठी याचा उपयोग सुरु करण्यात आला आहे. यामुळे शेतीमालाची पेरणी कुठे झाली, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत शिवाय जर भौगोलिक मानांकन मिळालेले फळ असेल तर त्याच्या पॅकिंगसोबतच जीआयचे प्रमाणपत्र जोडले जाते. ही पध्दत स्ट्ऱॉबेरी उत्पादकांनी सुरु केली आहे. आतापर्यंत केवळ 10 शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला असून पणन मंडळाने याचा वापर वाढवणे गरजेचे आहे.

केंद्र सरकारचीही मदत घेतली जाणार

‘जीआय’ प्राप्त कृषीमालाची विक्री करणाऱ्या ऑनलाईन पध्दतीला अटकाव अटकाव घालण्याची तरतूद होती. त्यानुसार नोटीस देऊन कारवाईही करता येत होती. पण आता न्यायालयाचा आदेश असल्याशिवाय कारवाई करता येत नाही. त्यामुळे ही अडचण कृषिविभागाने केंद्र सरकारला कळवली आहे. याशिवाय नियमांची अंमलबजावणी होत नसेल तर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेण्याबाबत सूचना द्याव्यात असे मतही कृषिमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market: सर्वकाही शेतकऱ्यांच्या मनासारखे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोयाबीनच्या दरात…

Summer Season: यंदा प्रायोगिक तत्त्वावर, आगामी काळात वाढणार उन्हाळी सोयाबीनचे क्षेत्र

आघाडीच्या काळात अन्नदात्यावरही अन्याय, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लोकप्रतिनिधींचे साखळी उपोषण

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.