कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन, दर घसरत असल्यामुळे शेतकरी संतप्त

गडगडलेल्या कांद्याच्या भावामुळे शेतकऱ्यांवर संकट देखीलं आलं आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला असून केलेला खर्चही कांदा पिकातून निघत नाही. सगळीकडे शेतकऱ्यांची (agricultural news in marathi) पिळवणूक होत आहे

कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन, दर घसरत असल्यामुळे शेतकरी संतप्त
agricultural news in marathiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 10:49 AM

धुळे : धुळे (dhule farmer news) जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवेल येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. कांद्याचा दर दिवसेंदिवस घसरु लागल्याने धुळे जिल्ह्यातील शेतकरी त्यामुळे संतप्त झाले आहेत. दहिवेल येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करत खासगी कृषी बाजार समितीच्या प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन, निषेध व्यक्त केला. या मार्केटमध्ये शेतकऱ्यांना तीन ते चार रुपये भावाने कांदा विकावा लागत आहे. या कांद्याच्या गडगडलेल्या भावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. गडगडलेल्या कांद्याच्या भावामुळे शेतकऱ्यांवर संकट देखीलं आलं आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला असून केलेला खर्चही कांदा पिकातून निघत नाही. सगळीकडे शेतकऱ्यांची (agricultural news in marathi) पिळवणूक होत आहे, आता शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कांद्याच्या भावात (onion rate down) घसरण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत. मात्र, तरी देखील भावात सुधारणा झालेली नाही. शासनाने आता तरी दखल घेऊन कांदा शेतमालाला योग्य भाव द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांतर्फे करण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यांनी वेगात सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे. त्यांनी कपाशीची लागवड सुरू केली आहे. जिल्ह्याला कपाशीच्या वाणाचे ८ लाख ८८ हजार पाकीट, तसेच ७० हजार १६१ मेट्रिक टन खत मिळाले आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्यानंतर मे महिन्यात उन्हाचा तडाखा होता. तसेच तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील बहुतांश भागात मान्सूनपूर्व पाऊस झाला. त्यानंतर आता पुन्हा उन्हाची तीव्रता वाढली आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामाची तयारी वेगात सुरू केली आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी कपाशीची लागवड करतात. त्यानुसार यंदाही अनेक शेतकऱ्यांचा कल कपाशीची लागवड करण्याकडे असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याला कपाशीच्या १० लाख ३० हजार ६४० बीटी पाकिटांची गरज होती. त्यानुसार ८ लाख ८८ हजार पाकीट मिळाली आहेत.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कृषी केंद्राकडून खोटी बियाने दिली जात असल्यामुळे शेतकरी सुध्दा चांगलेचं जागृत झाले आहेत. कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ला घेऊन बियाणांची खतांची खात्री झाल्याशिवाय शेतकरी बियाणे खरेदी नसल्याचं पाहायला मिळत आहे. कृषी अधिकाऱ्यांनी गैरवर्तन करणाऱ्या कृषी केंद्रांवरती कारवाई केली. त्याचबरोबर काही जणांचे परवाणे सुध्दा रद्द करण्यात आले आहेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.