Chickpea Crop : हरभऱ्याला हमीभावाचा आधार, हंगामाच्या मध्यावर आवक वाढली

| Updated on: Apr 11, 2022 | 11:27 AM

हमीभाव केंद्राकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टीकोन हळूहळू का होईना बदलत आहे. रब्बी हंगामात हरभऱ्याचे उत्पादन वाढल्यामुळे खुल्या बाजारपेठेतील दर स्थिरच आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये हरभऱ्याचे दर हे 4 हजार 600 पेक्षा जास्त झालेले नाहीत. दुसरीकडे हमीभाव केंद्रावर हरभऱ्याला 5 हजार 230 असा दर ठरविण्यात आला आहे. दरातील या तफावतीमुळे शेतकरी आता खरेदी केंद्र जवळ करु लागला आहे.

Chickpea Crop : हरभऱ्याला हमीभावाचा आधार, हंगामाच्या मध्यावर आवक वाढली
हरभऱ्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे.
Follow us on

परभणी : हमीभाव केंद्राकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टीकोन हळूहळू का होईना बदलत आहे. (Rabi Crop) रब्बी हंगामात (Chickpea Crop) हरभऱ्याचे उत्पादन वाढल्यामुळे खुल्या बाजारपेठेतील दर स्थिरच आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये हरभऱ्याचे दर हे 4 हजार 600 पेक्षा जास्त झालेले नाहीत. दुसरीकडे (Guarantee Center) हमीभाव केंद्रावर हरभऱ्याला 5 हजार 230 असा दर ठरविण्यात आला आहे. दरातील या तफावतीमुळे शेतकरी आता खरेदी केंद्र जवळ करु लागला आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 77 हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी झालेली आहे. या दोन्ही जिल्ह्यामध्ये 17 हमीभाव केंद्राच्या माध्यमातून हरभऱ्याची खरेदी सुरु आहे. या सर्व केंद्रावर 15 हजार 778 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून पैकी 5 हजार 325 शेतकऱ्यांचा 77 हजार 127 क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे. यापोटी पणन संघाने 8 कोटी रुपयांची बिले शेतकऱ्यांना अदा केली आहेत.

शेतकऱ्यांचा कल हमीभाव केंद्राकडे

हंगामाच्या सुरवातीला हमीभाव केंद्राला घेऊन शेचकऱ्यांमध्ये एक ना अनेक गैरसमज होते. पण यंदा हमीभाव केंद्राची संख्या वाढली असून पणन संघाच्या माध्यमातून जनजागृतीही करण्यात आली आहे. शिवाय बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 600 पर्यंतचा दर आहे तर खरेदी केंद्रावर 5 हजार 230 हा दर ठरवून दिला आहे. दरात 200 रुपयांपर्यंत जरी तफावत असली तरी शेतकरी खुल्या बाजारात हरभऱ्याची विक्री करेल पण सध्या 600 पर्यंतची तफावत आहे त्यामुळे उशिरा का होईना शेतकरी संख्या वाढत असल्याचे केंद्र चालक लालासाहेब देशमुख यांनी सांगितले आहे.

भविष्यात दरवाढीची अपेक्षा

सध्या हंगाम मध्यावर आला असून बाजारपेठेत सर्वाधिक आवक ही हरभऱ्याचीच आहे. आवव नियंत्रणात येताच बाजारपेठेतील दर वाढतील. शेतकऱ्यांनी जे सोयाबीन आणि कापसाबाबत धोरण आखले तेच हरभऱ्याबाबत प्रयोग केला तर हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळेल. यासाठी काही कालावधी जाणे गरजेचे असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना विश्वास पटला

हमीभाव केंद्रावर शेतीमालाची विक्री केल्यावर नियमित वेळी पैसे मिळत नाहीत हा गैरसमज होता. पण यंदा शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळत आहेत. शिवाय विक्रीनंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होत आहे. त्यामुळे अधिकाच्या दराचा आणि एकरकमी पैसे पदरात पडण्याच्या हिशोबाने शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

संबंधित बातम्या :

Photo Gallery | वृक्षवेलींची हिरवी माया अन् पिवळ्या फुलांचा शालू, रखखत्या उन्हाळ्यात भुरळ घालणारं ‘वनराई’तलं घर पाहिलंय?

Sangli : झाले गेले विसरुन पुन्हा डाळिंब उत्पादक जोमात, रोगराईच्या तडाख्यातून वाचलेल्या बागांसाठी धडपड

Kharif Season : सोयाबीन, कापसाचे उत्पादनही वाढणार अन् नुकसानही टळणार, राज्य सरकारचे धोरण काय?