Farmer Loan Waiver: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमाफीचा लाभ, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026: राज्यात शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेत मृत शेतकऱ्यांच्या वारसांना दिलासा मिळाला आहे. त्यासाठी आधार प्रमाणीकरण महत्त्वाचे करण्यात आले आहे. त्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील 6 लाख 22 हजार 207 पात्र शेतकऱ्यांना 5,029 कोटी रुपये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत वितरीत करण्यात आले. आता पुढील लाभाची प्रतिक्षा आहे. कर्जमफीच्या निकषात बसणारे पण मयत शेतकरी कुटुंबाला राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी मयत शेतकऱ्याच्या वारसदाराचे नाव महसुली दप्तरी नोंद करावी. नंतर त्याची पूर्तता सेवा संस्था आणि राष्ट्रीयकृत बँकेत करावी असे निर्देश देण्यात आले होते. आता आधार प्रमाणीकरणाविषयीची महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
बोटांचे ठसे न आल्यास हा उपाय
राज्यात आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 3 लाख 48 हजार इतकी आहे. त्यातील 50 हजार 806 मृत शेतकरी आहेत. राज्यातील 16 लाख 96 हजार पहिल्या यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांपैकी 13 लाख 48 हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. त्यातील 12 लाख 8 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला आहे.
आधार प्रमाणीकरण करताना काही शेतकऱ्यांचे बोटाचे ठसे उमटत नाही. त्यांची अडचण दूर करण्यात आली आहे. आपले सरकार केंद्र चालकच त्यांची ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. बँकांना मृत शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त सहा वारसांची नोंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करावे लागेल. स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही . ॲग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण प्रक्रियेनंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची आणि प्रोत्साहन पर रक्कम जमा होईल. शेतकऱ्यांची कर्जखाती नील होईल. त्यांना नव्याने पीक कर्ज घेता येईल.
दोन टप्प्यात कर्जमाफी
पु्ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात या महिन्या्च्या सुरुवातीला 7 ऑगस्ट रोजी 5,029 कोटी रुपये, राज्यातील 6 लाख 22 हजार 207 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. ही पीक कर्ज खाती आता निरंक झाली आहेत. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीचे पैसे देण्यात आले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी तीन टप्प्यात होणार नाही तर ती दोन टप्प्यात होणार आहे.