Grape Growers Association: निर्णय झाला- आता माघार नाही, सोलापूर विभागातही ठरले द्राक्षांचे दर

| Updated on: Jan 12, 2022 | 1:24 PM

आता किमान आधारभूत दरातून तरी दिलासा मिळावा ही भूमिका द्राक्ष उत्पादक संघानी घेतलेली आहे. द्राक्षच्या वाणानुसार दर निश्चित करण्यात आले आहेत. याची सुरवात नाशिक येथे झाली असून आता विभागनिहाय हा निर्णय होत आहे. यापूर्वी नाशिक, सांगली या ठिकाणी द्राक्ष आणि बेदाण्याचे दर ठरलेले आहेत.

Grape Growers Association: निर्णय झाला- आता माघार नाही, सोलापूर विभागातही ठरले द्राक्षांचे दर
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

सोलापूर : राज्यभरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यंदा केवळ निसर्गाच्या लहरीपणाचाच सामना करावा लागलेला आहे. आता किमान आधारभूत दरातून तरी दिलासा मिळावा ही भूमिका (grape growers association) द्राक्ष उत्पादक संघानी घेतलेली आहे. द्राक्षच्या वाणानुसार दर निश्चित करण्यात आले आहेत. याची सुरवात नाशिक येथे झाली असून आता विभागनिहाय हा निर्णय होत आहे. यापूर्वी नाशिक, सांगली या ठिकाणी द्राक्ष आणि बेदाण्याचे दर ठरलेले आहेत. आता (Solapur Division) सोलापूर विभागातील उस्मानाबाद, पंढरपूसाठीही दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भात पंढरपूर येथे बैठक पार पडली असून जे बैठकीत ठरले तोच दर शेतकऱ्यांनी कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Grape Rate) द्राक्ष आणि बेदाण्याचे दर हे 10 टक्के इतक्या झालेल्या खर्चावर नफा ठेऊन दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे किमान झालेला खर्च निघून चार पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. मात्र, यामध्ये बदल झाला तर सर्वकाही व्यर्थ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकी दाखवत हा निर्णय यशस्वी करुन दाखवण्याचे आवाहान संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार यांनी केले आहे.

यामुळे घेतला जातोय हा निर्णय

वर्षभर परीश्रम आणि उत्पादनावर खर्च करुनही शेतकऱ्यांना द्राक्ष पिकातून फारसा नफा मिळत नाही. शिवाय गेल्या तीन वर्षापासून तर निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान अधिक अन् उत्पन्न कमी अशी अवस्था राहिलेली आहे. द्राक्ष छाटणीला आले की व्यापारी वाटेल त्या किंमतीने मागणी करतात. शिवाय शेतकरीही वेगवेगळे दर ठरवून देतात. त्यामुळे अपेक्षित उत्पन्नच शेतकऱ्यांना मिळत नव्हते. त्यामुळे यंदा प्रथमच हा प्रयोग नाशिक संघानेन राबवला होता. त्यानंतर सांगली आणि आता सोलापूर विभागाने हा निर्णय घेतला आहे. पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

असे असणार आहेत द्राक्ष अन् बेदाण्याचे दर

द्राक्षाचे दर हे वाणानुसार ठरविण्यात आले आहेत. यामध्ये थॉमसन 35 रुपये किलो, माणिक चमन 40 रुपये, सुपर सोनका 50, तर आर.के.एस.एस एन आणि आनुष्का वाणाचे द्राक्ष हे 55 रुपये किलोने विक्री करण्याचा निर्णय झाला आहे. तर चांगल्या प्रतीचे बेदाणे 200 त्यापेक्षा हलक्या प्रतीचे 150 तर सर्वात कमी म्हणजे 100 रुपये प्रति किलोने विकावे असा निर्णय झाला आहे.

तीन जिल्ह्यांसाठी एकच निर्णय

सोलापूर द्राक्ष उत्पादक संघामध्ये उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग आहे. त्यामुळे हा निर्णय तीन्हीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आला आहे. शिवाय सर्वानुमते निर्णय झाला असल्याने यामध्ये शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर बदल केला तर संघाच्या भूमिकेला अर्थ राहणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने दराबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार यांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

Mumbai: एपीएमसी अत्यावश्यकमध्येच मात्र, पूर्वसूचना न देता आता कारवाईचा बडगा, काय आहेत प्रशासनाचे आदेश?

Sugar Factory: तेरणा सांगा कुणाचा? भैरवनाथ की ट्वेंटी वन, फैसला 31 जानेवारीला..! वाचा सविस्तर

दुष्काळात तेरावा : निसर्गाचा लहरीपणा अन् बोगस बियाणे, उत्पादनावरील खर्चानेच शेतकरी मेटाकूटीला