लासलगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना ‘तारणारी’ योजना, शेतीमाल साठवणुकीचीही सोय

| Updated on: Nov 18, 2021 | 12:46 PM

शेतीमाल तारण योजनेमुळे शेतकऱ्यांना मालाची साठवणूक तर करता येणार आहेत शिवाय साठवलेल्या मालावर कर्जही उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा असलेल्या या योजनेला आता निफाड तालुक्यातील लासलगाव बाजार समितीमध्ये सुरवात झाली आहे.

लासलगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना तारणारी योजना, शेतीमाल साठवणुकीचीही सोय
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
Follow us on

लासलगाव : शेतीमालाची साठवणूक करण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना दर कमी असतानाही विक्री करण्याची नामुष्की येते. त्यामुळे आर्थिक नुकसानही होते. मात्र, (Agricultural Mortgage Scheme) शेतीमाल तारण योजनेमुळे शेतकऱ्यांना मालाची साठवणूक तर करता येणार आहेत शिवाय साठवलेल्या मालावर कर्जही उपलब्ध होणार आहे. (Benefit Farmers) शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा असलेल्या या योजनेला आता निफाड तालुक्यातील लासलगाव बाजार समितीमध्ये सुरवात झाली आहे. त्यामुळे आता योग्य दर मिळाला तरच विक्री हे देखील शक्य होणार आहे.

मका व सोयाबीन काढणीचे काम चालु झाले असुन सदरचा शेतीमाल एकाचवेळी बाजार समिती आवारात विक्रीस आल्यामुळे बाजारभाव कमी होऊन शेतक-यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणुन लासलगाव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली आहे. गेल्या 15 वर्षापासून ही योजना बाजार समितीमध्ये ही योजना सुरु आहे.

या पिकांचा योतजनेत समावेश

लासलगांव बाजार समितीने सन 2021-22 या हंगामाकरीता शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत मका, सोयाबीन, चना, गहू या मुख्य शेतीमालाची साठवणूक करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला तरच मालाची विक्री शक्य होणार आहे. शासकीय प्रतवारी आणि बाजार समितीचे प्रतवारी यांनी संयुक्तरित्या शिफारस केलेल्या मका, सोयाबीन, चना व गहु हा शेतीमाल महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात तारण म्हणुन ठेवला जाईल.

आवक वाढल्याने दरात घट

निफाड तालुक्यातील मका व सोयाबीन काढणीचे काम चालु झाले असुन सदरचा शेतीमाल एकाचवेळी बाजार समिती आवारात विक्रीस आल्यामुळे बाजारभाव कमी होऊन शेतक-यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळेच ही योजना सुरु करण्यात आल्याचे बाजार समित्याच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले आहे. त्यामुळे या योजनेचा शेतकरी लाभ घेतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.

शेतीमालावर मिळते कर्ज

1.शेतमाल प्रकार : सुर्यफूल, सोयाबीन, तुर, उडिद, भात , करडई, मुग, हळद, चना या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

2. शेतमाल प्रकार : मका,ज्वारी, गहू, बाजरी या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

3. शेतमाल प्रकार : काजू बी या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

4. शेतमाल प्रकार : बेदाणा या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

संबंधित बातम्या :

पावसाचे पाणी द्राक्षांच्या घडात, फळ बागायत शेतकऱ्यांवर अवकाळीची ‘अवकृपा’

PM Kisan : सरकारने नियम बदलले! आता ‘या’ कागदपत्राशिवाय शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत

रिलायन्स विमा कंपनीचे अणखीन एक गुपित समोर, चौकशीनंतर होणार कारवाई