शेतकऱ्यांसाठी खुशखबर, सोयाबीनच्या हमीभावात मोठी वाढ, केंद्र सरकारकडून खरीप हमीभाव जाहीर

| Updated on: Jun 08, 2023 | 8:08 AM

सोयाबीनला चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी मागच्या दोन वर्षांपासून निराश असल्याचं पाहायला मिळत आहे. आज केंद्र सरकारकडून चांगली बातमी जाहीर करण्यात आली असून सर्व पिकांच्या हमीभावात ६ ते १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, सोयाबीनच्या हमीभावात मोठी वाढ, केंद्र सरकारकडून खरीप हमीभाव जाहीर
agricultural news in marathi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : देशात खरीप आणि रब्बी हंगामात पिकांचं मोठं (maharashtra crop demage) नुकसान झाल्यामुळे शेतकरी (maharashtra agricultural news in marathi) हवालदिल झाल्याचे चित्र देशात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन अनेक ठिकाणी आंदोलनं केली आहे. निराश झालेला शेतकरी सध्या खरीप पेरणी करण्याच्या तयारीत आहे. अनेक ठिकाणी खरीप हंगामाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु काही शेतकरी अद्याप पावसाची वाट पाहत आहेत. आज केंदीय अर्थमंत्री पियुष गोयल (Union Finance Minister Piyush Goyal) यांनी खरीप हंगाम २०२३-२०२४ साठी विविध पिकांचे हमीभाव जाहीर (Guaranteed prices of crops announced) केले आहेत. विशेष म्हणजे ही घोषणा करतांना त्यांनी २०१४-१५ च्या हमीभावाशी तुलना करून २०२४ निवडणूका ही डोळ्यासमोर ठेवल्या असल्याची सगळीकडं चर्चा आहे. २०२१ च्या हंगामात १० हजाराच्या पार गेलेल्या सोयाबीनला मागील दोन वर्षांपासून अत्यल्प दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ३०० रुपयांची वाढ

आज जाहीर झालेल्या हमीभावात केंद्र सरकारने मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ३०० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. २०२२-२०२३ च्या हंगामात सोयाबीनला ४३०० रुपये हमीभाव होता. जो यावर्षी ४६०० रुपये इतका असणार आहे. सरकारने याला मोठी वाढ म्हटले असले, तरी शेतकरी मात्र या बाबत समाधानी नाहीत. शेतकऱ्यांच्या मते उत्पातन खर्च हा यापेक्षा जास्त आहे. वाढलेला खर्च बघता सोयाबीनला किमान ६००० रुपये हमीभाव असणे गरजेचे होते, असे वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

तुरीच्या हमीभावातही ४०० रुपयांची वाढ

सध्या तुरीच्या दराने ११ हजाराचा टप्पा पार करून नवा उच्चांक गाठला असल्याने केंद्र सरकारने दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे यंदा तुरीच्या हमीभावात वाढ होणार नाही असा अंदाज होता. मात्र केंद्र सरकारने यात वाढ करून ७००० रु प्रतिक्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे. मागील वर्षी तुरीच्या ६६०० रुपये हमीभाव होता.

हे सुद्धा वाचा

फडणवीसांनी मानले आभार

केंद्र सरकारने विविध पिकांचे हमीभाव जाहीर केल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी नरेंद्र मोदी यांचे सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्यावतीने केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

इतर पिकांचे हमीभाव

धान – २१८३ रु.
कापूस – ७०२० रु
ज्वारी (हायब्रीड) – ३१८० रु
मक्का – २०९०
मूग- ८५५८ रु (सर्वाधिक १०.३५ % वाढ)
तूर – ७००० रु
भुईमूग- ६३७७