AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोयाबीन अद्यापही शेतकऱ्यांच्या घरातच पडून, शेतकऱ्यांना वाढीव दराची अपेक्षा

बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथील शोभा परमेश्वर तेजल यांच्या शेताच्या मधोमध डीपी आहे. त्या ठिकाणावरून शेतकऱ्यांच्या शेतात वीज जोडणी केलेली आहे.

सोयाबीन अद्यापही शेतकऱ्यांच्या घरातच पडून, शेतकऱ्यांना वाढीव दराची अपेक्षा
Soybean cropImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jun 06, 2023 | 3:51 PM
Share

गणेश सोलंकी, बुलढाणा : बुलढाणा (buldhana) जिल्ह्यातील सोयाबीन (Soybean) उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात अद्यापही सोयाबीन पडून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. मागील वर्षी सोयाबीनला 9 हजारांच्यावर दर मिळाला होता. मात्र यावर्षी तो दर कमी होऊन 5 हजाराच्या आत आला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादनाचा खर्च सुद्धा निघेनासा झाला असल्याची माहिती शेतकरी देत आहेत. सोयाबीन दर वाढतील, अशी अपेक्षा असल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात सोयाबीन विकले नाही. मात्र बाजारात सोयाबीन दर वाढायला सुद्धा तयार नाहीत. एकीकडे सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना बियाणे, खताचे नियोजन करायचे आहे. मात्र सोयाबीन विकली नसल्याने त्याचे नियोजन कसे करायचे हा प्रश्न शेतकऱ्यानं (FARMER  NEWS IN MARATHI) समोर उभा आहे. त्यामुळे दर वाढ व्हावी हीच अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे…

बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथील शोभा परमेश्वर तेजल यांच्या शेताच्या मधोमध डीपी आहे. त्या ठिकाणावरून शेतकऱ्यांच्या शेतात वीज जोडणी केलेली आहे. परंतु महावितरण मार्फत टाकण्यात आलेले विद्युत खांब हे जास्त अंतरावर असल्याने विद्युत पुरवठा सुरू असलेले तार या खाली लोंबकळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत धरून मशागतीची कामे करावी लागत आहेत. या संदर्भात संबंधित शेतकऱ्याने वारंवार महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून लेखी व तोंडी तक्रारी केलेल्या आहेत. मात्र अजूनही विद्युत तार वरती न घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयावर कापूस फेकून आंदोलन

मागील वर्षी कापसाला 13 हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता. मात्र या वर्षी कापसाला 7 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आज शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी व शेतकऱ्यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर कापूस फेकून आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कापसाला प्रतिक्विंटल 13 हजार रुपये भाव होता. मात्र या सरकारने बाहेर देशातून कापसाच्या गाठी आयात करून देशातील कापसाचे भाव पडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला केला आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...