AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉमनवेल्थ स्पर्धेत देशाला गोल्ड मिळवून देणाऱ्या खेळाडूची राज ठाकरेंकडून उपेक्षा! नेमकं काय घडलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान एक विचित्र प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे. भारताची मान उंचवणाऱ्या दिलीप गावित 2 ताटकळत ठेवून भेट न दिल्याची चर्चा रंगली आहे.

कॉमनवेल्थ स्पर्धेत देशाला गोल्ड मिळवून देणाऱ्या खेळाडूची राज ठाकरेंकडून उपेक्षा! नेमकं काय घडलं?
कॉमनवेल्थ स्पर्धेत देशाला गोल्ड मिळवून देणाऱ्या खेळाडूची राज ठाकरेंकडून उपेक्षा! नेमकं काय घडलं?Image Credit source: TV9 Network/X
| Updated on: Aug 06, 2026 | 11:46 PM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दौऱ्यात भारताला कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या खेळाडूचा अपमान झाल्याची चर्चा रंगली आहे. राज ठाकरे 6 आणि 7 ऑगस्ट या दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आले होते. या भेटीत पक्षाचा आढावा घेण्यासाठी त्याने बैठक घेतली. या दौऱ्यादरम्यान कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावणारा दिलीप गावित आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे राज ठाकरेंच्या भेटीला आले होते. मात्र त्यांना तब्बल 2 ते अडीस भेटीसाठी वाट पाहिली पण भेट काही झाली नाही. राज ठाकरे यांच्या भेटीची आशा धूसर झाल्यानंतर दिलीप गावित आणि वैजनाथ काळे निघून जात होते. सदर प्रकार पाहिल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कोणाचीच विनवणी ऐकली नाही. अपमान झाल्याच्या भावनेतून ते तेथून निघून गेल्याची चर्चा आता रंगली आहे.

काय म्हणाले प्रशिक्षक वैजनाथ काळे?

कॉमनेवल्थ पदक विजेता दिलीप गावित आणि प्रशिक्षक वैजनाथ काळे यांना निघून जात असताना पत्रकारांनी गराडा घातला आणि निघण्याचं कारण विचारलं. तेव्हा वैजनाथ काळे म्हणाले की, ‘तसं काही कारण नाही. सर थोडे व्यक्त असल्याने नंतर भेटू. नाराज वगैरे काही नाही. आम्ही महाराष्ट्र आणि देशासाठी काम केलं आहे. त्यामुळे नाराजी असं काही. ते व्यस्त होते. आमच्या ट्रेनिंगचा टाईम झाला आहे. आमची भेट झाली नाही.’ साहेबांना आम्ही नंतर भेटू असं म्हणत दोघेही परतले.

कोण आहे दिलीप गावित?

कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने चांगली कामगिरी केली आणि पदतालिकेत चौथं स्थान पटकावलं. भारताने 13 सुवर्ण पदक पटकावली. त्यातील एक सुवर्ण पदक हे पुरूषांच्या 100 मीटर टी 47 प्रकारात नाशिकच्या दिलीप गावित याने पटकावलं. त्याच्या कामगिरीमुळे देशाची मान अभिमानाने उंचावली. दिलीपने अवघ्या 10.71 सेकंदात विक्रम वेळ नोंदवत गोल्ड मेडल पटकावलं. एकीकडे देशभरात त्याच्या कामगिरीचं कौतुक होत असताना नाशिकमध्ये मिळालेल्या वागणुकीमुळे संतापाचं वातावरण आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा