AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केतन अग्रवाल प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट! चेतन आणि सिया गोयल यांनी राजस्थानच्या..

केतन अग्रवाल प्रकरणात एका मागून एक मोठे खुलासे होत आहेत. त्यातच पोलिसांनी चेतन आणि सिया यांच्या लग्नाच्या फोटोवरून तपास केला. त्यातच पोलिसांना मोठी माहिती मिळाली. केतन अग्रवाल प्रकरणानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

केतन अग्रवाल प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट! चेतन आणि सिया गोयल यांनी राजस्थानच्या..
Ketan Agarwal case
| Updated on: Sep 21, 2026 | 9:21 AM
Share

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असलेल्या केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांनी अखेर चार्जशीट दाखल केले. केतन अग्रवाल याचे लग्न सिया गोयल हिच्यासोबत ठरले होते. लग्नाची जोरदार तयारी घरात सुरू होती. मात्र, सिया गोयल हिला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. घरच्यांना हे सांगण्याऐवजी लोहगडाहून थेट केतन याला ढकलून सियाने दिले. याप्रकरणात एका मागून एक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. केतनचे कुटुंब न्याय मागत आहे. त्यातच केतन अग्रवाल प्रकरणाच्या तपासात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या कथित गुप्त विवाहाचा मुद्दा समोर आला आहे.  राजस्थानमधील खाटूश्याम मंदिरात दोघांनी लग्न केल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार पोलिसांनी तपास केला. मात्र, राजस्थानमध्ये चौकशी करूनही लग्नाची अधिकृत नोंद किंवा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

सिया गोयल हिच्या भांगेत सिंदूर आणि चेतनच्या गळ्यात फुलांचा हार असलेला फोटो आरोपींच्या मोबाईलमधून मिळाल्याचे सांगण्यात येत असून, हा फोटो पोलिसांनी दोषारोपपत्रासोबत न्यायालयात सादर केल्याची माहिती आहे. पोलिसांच्या तपासानुसार सिया आणि चेतन यांच्यात ऑक्टोबर 2025 पासून जवळीक होती. डिसेंबरमध्ये दोघे मित्रांसोबत राजस्थानला गेले होते. त्यानंतर सियाचे केतन अग्रवालसोबत लग्न ठरले आणि 19 फेब्रुवारी 2026 रोजी साखरपुडा झाला.

मात्र, पोलिसांच्या आरोपानुसार त्यानंतर केतनच्या हत्येचा कट रचण्यात आला. 31 मे रोजी लोहगड किल्ल्यावरून केतनला दरीत ढकलण्याची कल्पना पुढे आली, असा पोलिसांचा दावा आहे. 14 जूनचा प्रयत्न फसला आणि 18 जून रोजी केतनला सुमारे 400 फूट खोल दरीत ढकलून हत्या केल्याचा आरोप आहे.

खून केल्यानंतर चेतन जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील एका हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी गेल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. या फुटेजमुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. चेतन आणि सिया यांच्याकडून अनेकदा केतनला मारण्याा प्रयत्न झाला. मात्र, दरवेळी तो थोडक्यात वाचत होता. केतन अग्रवाल याच्या निधनाचा धक्का त्याच्या आजोबांना बसला आणि त्यांनीही जगाचा निरोप घेतला.

Follow Us
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत