ठाकरे गटाला मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेना शिंदे गटात प्रवेश, मुंबईतच..
शिवसेना ठाकरे गटाला एका मागून एक मोठे धक्के देताना शिवसेना शिंदे गट दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या तब्बल 6 आमदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता मुंबईत शिंदे गटाकडून ताकद वाढवली जात आहे.

शिवसेना पक्षात मोठी फुट पडली. त्यानंतर आता पुन्हा एका मागून एक मोठे धक्के ठाकरे गटाला बसताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटातील तब्बल 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. यासोबतच अजूनही काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जातंय. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर कोर्टात सुनावणीही सुरू आहे. ठाकरे गटाल लागलेली घर घर काही कमी होताना दिसत नाही. महत्वाचे पदाधिकारीही पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. नुकताच आता शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का शिंदेंनी दिला. थेट ठाकरेंचा बालेकिल्ला धक्का देण्यात आला. शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाला राम राम करत थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का म्हणावा लागेल. फक्त शिवसेना ठाकरे गटच नाही तर काँग्रेसलाही धक्का बसला. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
शिवसेना सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते मोठा पक्षप्रवेश पार पडला. माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे मुंबई समन्वयक निखिल प्रकाश गुळेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हा ठाकरे गटाला मोठा धक्का आहे. यासोबतच शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
शिवसेना ठाकरे गटातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिंदे गटाची ताकद चांगलीच वाढली आहे. ज्यामुळे मुंबईत आता शिंदे गटाची ताकद वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाकडून ठाण्यानंतर मुंबईत ताकद वाढवली जात आहे. ठाकरेंचे पदाधिकारी मोठ्या संख्येने शिंदे गटात प्रवेश करत आहेत.
उत्तर मुंबईत शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता, शिंदे गटाकडून ताकद वाढवली जात आहे. कार्यकर्ते आणि कामगार बांधवांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला ताकद मिळाल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. नव्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार बांधवांचे शिवसेनेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
