AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात मोठी खळबळ! गरब्यासाठी मुलींची भाडेतत्त्वावर बोली? नेमकं प्रकरण काय?

नवरात्र हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. पण आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गरब्यासाठी मुलींची भाडेतत्त्वावर देण्यासाठी बोली लावण्यात आली आहे.

महाराष्ट्रात मोठी खळबळ! गरब्यासाठी मुलींची भाडेतत्त्वावर बोली? नेमकं प्रकरण काय?
GarbaImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 21, 2026 | 9:11 AM
Share

नवरात्री हा भारतातील सर्वात सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध उत्सव मानला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवी दुर्गाची उपासना केली जाते. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नवरात्रीच्या काळात गरबा आणि डांडिया हे पारंपरिक नृत्य विशेष गाजतात. रंगीबेरंगी कपडे, ढोल-ताशांचा गजर आणि गरबे हे या सणाचे वैशिष्ट्य आहे. गरब्यात पुरुष-स्त्रिया एकत्र येऊन वर्तुळात नृत्य करतात. हा उत्सव एकतेचा, भक्तीचा आणि आनंदाचा प्रतीक मानला जातो. मात्र अलीकडे याच पारंपरिक उत्सवात काही घाणेरडे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत आहे.

महाराष्ट्रात गरबा डान्स करण्यासाठी मुलींना भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रकार समोर आला आहे. काही ठिकाणी मुलींची १००० ते ५००० रुपयांच्या दरम्यान बोली लावून गरबा खेळण्यासाठी त्यांना बोलावले जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या प्रकाराला संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शविला आहे.

संभाजी ब्रिगेडचा विरोध

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता ॲड. संतोष शिंदे यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, “महाराष्ट्रात भाडेतत्त्वावर गरब्यासाठी मुली देण्याचा हा गोरखधंदा संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही. गरबा डान्स करण्यासाठी जर मुला-मुलींची १००० ते ५००० रुपये पर्यंत भाड्याने बोली लागत असेल, तर संभाजी ब्रिगेड असे कार्यक्रम उधळून लावल्याशिवाय शांत बसणार नाही. पुरोगामी महाराष्ट्रात असले हे घाणेरडे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.”

शिंदे यांनी पुढे सांगितले की, राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे आणि उत्सवाचे दिवस सुरू आहेत. अशा वेळी पारंपरिक उत्सव चुकीच्या धन दांडगे लोकांमुळे बदनाम होऊ नये, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवांना व्यावसायिक स्वार्थासाठी विकृत करण्याचे प्रकार थांबवले पाहिजेत.

संभाजी ब्रिगेडने या मुद्द्यावर कठोर भूमिका घेत असल्याने नवरात्रीच्या काळात अशा प्रकारच्या कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. पारंपरिक गरब्याची शुद्धता आणि सांस्कृतिक मूल्ये जपण्यासाठी समाजानेही जागरूक राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Follow Us
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत