AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM मोदींचा नवा इन्स्टा Video आला, जनतेला केलेले खास आवाहन काय?

PM Modi Video : पंतप्रधान मोदी गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. आज त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून देशवासियांना खास आवाहन केले आहे.

PM मोदींचा नवा इन्स्टा Video आला, जनतेला केलेले खास आवाहन काय?
PM Modi New insta VideoImage Credit source: Instagram
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 06, 2026 | 10:52 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. पंतप्रधान खासकरून इन्स्टाग्रामवर सतत नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच आता राष्ट्रीय हातमाग दिन (7 ऑगस्ट) पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक विशेष व्हिडिओ शेअर करत स्वदेशीचा संदेश दिला आहे. देशाचा इतिहास, स्वातंत्र्यलढा आणि स्वदेशी आंदोलनाची आठवण करून देत त्यांनी पारंपरिक विणकर समाजाला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी नागरिकांनी हातमाग उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय म्हणाले PM मोदी ?

पंतप्रधानांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले की, मित्रांनो, 7 ऑगस्ट 1905 हा दिवस आपण कधीही विसरू नये. याच दिवशी भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झाली होती. आत्मनिर्भर भारताची पायाभरणी याच आंदोलनातून झाली. ब्रिटिशांविरोधातील या लढ्यात संपूर्ण देश एकवटला होता. गेल्या आठवड्यात आपण सर्वांनी फ्रेंडशिप डे साजरा केला. त्याच उत्साहाने 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिनही साजरा करूया. हातमाग दिन साजरा करण्याचा अर्थ म्हणजे प्रत्येक गरीब आणि विणकर कुटुंबाचा उत्साह वाढवणे. चला, अशा छोट्या कुटुंबांना सक्षम बनवूया. हातमाग दिनानिमित्त प्रत्येकाने काही ना काही हातमाग उत्पादन नक्की खरेदी करावे.’

यापूर्वीच्या व्हिडिओत विद्यार्थ्यांबाबत भाष्य

पंतप्रधानांनी याआधी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत देशातील युवकांशी संवाद साधला होता. त्यावेळी पंतप्रधान म्हणाले होते की, ‘आज वाटतंय की फक्त तुमच्याशीच बोलावं. जंतर-मंतरवर जे काही घडलं ते देशाने आणि जगाने पाहिलं. काही खोडकर मुलांनी अत्यंत अशोभनीय भाषा वापरली. मला शिवीगाळ करण्यात आलीच, पण माझ्या स्वर्गीय आईलाही लक्ष्य करण्यात आलं.’

पुढे बोलताना पंतप्रधानांनी म्हटले होते की, ‘लहानपणी चुका होतात आणि त्या सुधारण्याची संधीही असते. समाजात जो संताप आहे, तो मला पूर्णपणे समजतो. आपल्या मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, हा एक सांस्कृतिक धक्का आहे. पण ही वेळ त्यांना दूर लोटण्याची नाही, तर त्यांना जवळ घेऊन योग्य दिशा दाखवण्याची आहे.’

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा