Nagpur : राज्यातील धान्य मार्केट बंद, ‘जीएसटी’ च्या विरोधात एकवटले व्यापारी..!

| Updated on: Jul 16, 2022 | 11:16 AM

'जीएसटी' कचाट्यातून अन्नधान्याला सूट देण्यात आली होती. मात्र, या निर्णयावर सरकार कायम राहिलेले नाही. या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना की व्यापाऱ्यांना हे देखील स्पष्ट झालेले नाही. पण व्यापाऱ्यांवरच याचा भार पडणार असल्याने राज्यभरातून विरोध केला जात आहे. सोमवारपासून अन्नधान्यावर 5 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा यासाठी शनिवारी राज्यातील धान्य मार्केट बंद ठेवण्यात आले आहे.

Nagpur : राज्यातील धान्य मार्केट बंद, जीएसटी च्या विरोधात एकवटले व्यापारी..!
Follow us on

नागपूर : आतापर्यंत (GST) जीएटीमधून धान्याची सूटका होती. मात्र, धान्य पदार्थावरही जीएसटी आकारण्याचा निर्णय (Government decision) सरकारने घेतला असून त्याची 18 जुलैपासून अंमलबजावणी होणार आहे. याचा परिणाम व्यापारी आणि थेट ग्राहकांवर होणार आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवत नागपूरसह राज्यभरातील धान्य मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय (State Traders Association) राज्य व्यापारी संघटनेने घेतलेला आहे. शिवाय जीएसटी च्या विरोधात सांकेतिक आंदोलनही होणार असल्याचे व्यापारी संघटनेने सांगितले आहे. त्यामुळे शनिवारी बाजार समिती आणि किरकोळ धान्य विक्रेत्यांकडून धान्य हे खरेदी केले जाणार नाही. याचा फटका शेतकऱ्यांनाही काही प्रमाणात का होईना बसणार आहे.

18 जुलैपासून धान्यावर 5 टक्के ‘जीएसटी’

‘जीएसटी’ कचाट्यातून अन्नधान्याला सूट देण्यात आली होती. मात्र, या निर्णयावर सरकार कायम राहिलेले नाही. या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना की व्यापाऱ्यांना हे देखील स्पष्ट झालेले नाही. पण व्यापाऱ्यांवरच याचा भार पडणार असल्याने राज्यभरातून विरोध केला जात आहे. सोमवारपासून अन्नधान्यावर 5 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा यासाठी शनिवारी राज्यातील धान्य मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. सांकेतिक आंदोलनही व्यापाऱ्यांच्या माध्यमातून केले जाणार आहे. व्यापाऱ्यांच्या या भूमिकेचा आता काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.

…अन्यथा तीव्र आंदोलन

सरकारच्या या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना थेट आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. किमान या जाचक प्रक्रियेतून अन्नधान्याची सूटका व्हावी अशी मागणी होत आहे. मात्र, सोमवारपासूनच अन्न धान्यावर देखील जीएसटी लागू केला जाणार आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचे राज्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिपेन अग्रवाल यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

धान्यमार्केट कडकडीत राहणार बंद

सरकारच्या निर्णयाला विरोध करीत राज्यातील व्यापारी हे एकवटले आहेत. ‘जीएसटी’ अट मागे घ्यावी अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची देखील अडचण होऊ शकते. त्यामुळे पुर्वीचेच निर्णय कायम ठेऊन यामधून शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना सूट मिळावी अन्यथा राज्यभर आंदोलन उभारले जाणार आहे. शनिवारी राज्यभर धान्य मार्केट हे बंद राहणार आहे. बाजार समित्यांसह यामध्ये किरकोळ व्यापाऱ्यांचाही सहभाग राहणार आहे.