पालघर शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : वाडा कोलम तांदळाला भौगोलिक मानांकन, जागतिक बाजारपेठेतही मागणी

| Updated on: Oct 06, 2021 | 2:26 PM

वाढलेल्या मागणीमुळे या जातींना वाडा कोलम असे नाव देण्यात आले. तर आता या तांदळाला भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. त्यामुळे या तालुक्यातील वाडा कोलम शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. 

पालघर शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : वाडा कोलम तांदळाला भौगोलिक मानांकन, जागतिक बाजारपेठेतही मागणी
वाडा तांदूळ
Follow us on

मुंबई : पालघर (Palghar) जिल्ह्यातील वाडा तालुक्यात झिणी व सुरत या जातीच्या भाताची लागवड केली जाते. येथील जमिन व वातावरण हे पोषक असल्याने तालुक्याच्या अनेक भागांत त्याची लागवड केली जाते.  कालांतराने वाढलेल्या मागणीमुळे या जातींना वाडा कोलम असे नाव देण्यात आले. (geographical indication) तर आता या तांदळाला भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. त्यामुळे या तालुक्यातील वाडा कोलम शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे.

सन 1910 पासून ‘तांदळाचे कोठार’ मानल्या जाणाऱ्या वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात झिणी व सुरती या जातीच्या भाताची लागवड केली जात असे. जंगलातील पाळ्याची साठवणूक करून, जमिनीची मशागत करून पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनेच या वाणांची लागवड शक्य असते. वाडा तालुक्यातील जमीन व वातावरण या भाताला पोषक असल्याने तालुक्याच्या अनेक भागांत त्याची लागवड केली जाते. मुंबईतील मोठ्या हॉटेलांमधील परदेशी पाहुण्यांच्या पसंतीलाही या झिणी व सुरती तांदळाची चव उतरली.

कालांतराने वाढलेल्या मागणीमुळे या जातींना वाडा कोलम असे नाव देण्यात आले. वाडा कोलम शेतकरी उत्पादन सहकारी संस्था, वाडा झिनिया कोलम उत्पादक सहकारी संस्था मर्या. लि. याने कोलमचे भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी मागील तीन वर्षांपासूम प्रयत्न सुरू केले. 29 सप्टेंबरला या मानांकनाला तत्त्वतः मंजुरी दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे आता जागतिक बाजारपेठेत वाडा तांदळाला मागणी वाढत आहे.

भारतामध्ये तांदळाच्या सर्वाधिक प्रजाती

फिलिपाईन्सस्थित इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटकडे (आयआरआरआय) तांदूळ जनुक बँक आहे. यामध्ये 1 लाखाहून अधिक धानाच्या प्रजाती आहेत. त्यापैकी 60,000 एकट्या भारतातील आहेत. यात महाराष्ट्रानेही खूप योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध तांदूळ ‘वाडा कोलाम’ला नुकताच जीआय (जिओग्राफिकल इंडिकेशन) टॅग (geographical indication) मिळाला. कोकण, नागपूर विभाग तसेच कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि आसपासच्या परिसरातील लोकांचे मुख्य खाद्य पीक आहे.

वाडा कोलम शेतकऱ्यांना लाभ मिळेल

महाराष्ट्रातील प्रसिद्ध तांदूळ ‘वाडा कोलाम’ तांदूळ (वडा कोलाम) यांना जीआय (जिओग्राफिकल इंडिकेशन) टॅग मिळाला आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात या कोलम तोदळाची अधिक प्रमाणाक लागवड केली जाते. या वाडा तांदळाच्या झिणी आणि सुरत असे दोन प्रकार आहेत. भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्यामुळे वाडा तांदळाला आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत वाडा तांदळाची किंमत ही 60-70 रुपये किलो आहे

भौगोलिक मानांकनाचे फायदे

एखाद्या वस्तूला किंवा पिकाला विशिष्ट ठिकाणाचा जीआय टॅग मिळाला की त्या सर्वांना त्या ठिकाणला एक वेगळे महत्व येते. बाजारात दर्जेदार व अस्सल वाडा कोलम हाच तांदूळ ग्राहकांना मिळणार
त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा उत्साह आता दुणावला असून यापेक्षा अधिकचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करणार आहेत तर उत्पन्नवाढीसह शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाडा तांदळाला अधिकचे महत्व प्राप्त होणार आहे.

 

470 शेतकऱ्यांच्या प्रयत्नाला यश

वाडा कोलम तांदळाचा दर्जा ढासळू नये अशी येथील शेतकऱ्यांची भुमिका होती. शिवाय कोणताही तांदूळ हा वाडा कोलम असल्याचे सांगत त्याची विक्री केली जात होती. त्यामुळे दर्जा ढासळत होता. त्यामुळे या तांदळाला भौगोलिक मानांकन मिळावे या हेतूने वाडा कोलम शेतकरी उत्पादन सहकारी संस्थेतील 470 शेतकरी हे प्रयत्न करीत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. (Happy News for Palghar Farmers: Wada Kolam Rice gets geographical rating, demand in global market too)

संबंधित बातम्या :

आंबा प्रक्रिया उद्योगाला मिळणार उभारी, 141 उद्योजकांना मिळणार संधी

हिवाळ्यात होईल दुध उत्पादनात घट, अशी घ्या जनावरांची काळजी

साखर आयुक्तालयांच्या नियमांचे पालन करा, अन्यथा कारखान्याच्या संचालकावर गुन्हा दाखल