भारतातील शेतीमधून हिटलर तांदूळ उत्पादित होणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

हैदराबाद येथील एका कंपनीनं हिटलर 711 या वाणाचं बियाणं तयार केलं आहे. Hyderabad rice Hitlar-711

भारतातील शेतीमधून हिटलर तांदूळ उत्पादित होणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
hitlar 711

हैदराबाद: केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. भारतातील प्रमुख पिकांपैकी एक म्हणून तांदूळ पिकाचा उल्लेख केला जातो. देशातील विविध भागातील शेतकऱ्यांकडून भात लागवडीची तयारी सुरू झालेली आहे. देशात अनेक प्रकारचा तांदूळ उत्पादित केला जातो. हिटलर-711 ही हैदराबादेतील कंपनीने तयार केलेलं तांदळाचं संकरित वाण चर्चेत आहे. उत्तर प्रदेश बिहार या राज्यातील शेतकऱ्यांनी देखील हिटलर 711 या संकरित वाणाची लागण तयारी सुरू केली आहे. हिटलर नावामुळे तुम्हाला याचा संबंध जर्मनीशी असेल असं वाटेल मात्र तसं काही नाही. (Hyderabad based company developed paddy rice Hitlar-711 know details about it )

हिटलर-711 हे नाव का ठेवलं?

हिटलर-711 हे नाव का ठेवलं याबाबत अधिक माहिती मिळाली नाही. मात्र एका विक्रेत्यानं याची लागवड गेल्यावर्षी उत्तर प्रदेशातील काही भागात आणि पूर्वांचल मधील काही भागांमध्ये झाल्याचं सांगितलं. विक्रेत्यांकडून हिटलर नावापेक्षा त्यातून मिळणाऱ्या उत्पादनाकडे लक्ष द्या असं सांगण्यात आलं.

हिटलर-711 ची वैशिष्ट्ये

हिटलर-711 चं तांदूळ पीक 125 ते 130 दिवसांमध्ये तयार होतं. यापासून प्रति एकरी 18 क्विंटल उत्पादन होते असं सांगण्यात आला आहे. हिटलर तांदूळ पातळ असून चविष्ट आहे. हिटलर 711 संकरित वाण भारतीय देशी तांदळासारखा चविष्ट आहे असा देखील दावा करण्यात आला आहे. रोपांची उंची 190 सेमीपर्यंत जाते.

भारत सर्वात मोठा उत्पादक मात्र हेक्टरी उत्पादनात मागे

जगभरामध्ये तांदळाचे एकूण 1 लाख पेक्षा अधिक वाण आहेत. एकट्या भारतामध्ये यामधील 60000 प्रकारचा तांदूळ उत्पादित केला जातो. भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश असून निर्यातदार देखील आहे. मात्र प्रति हेक्‍टरी उत्पादनात आपण जगामध्ये मागे आहोत. जागतिक पातळीवर प्रति हेक्‍टर 4546 किलो तांदळाचं उत्पादन केलं जातं तर भारतामध्ये 3576 किलो तांदूळ प्रतिहेक्‍टरी मिळतो. भारतात खरीप आणि रब्बी हंगामात तांदूळ पीक घेतलं जातं. खरिपाच्या तुलनेत रब्बी हंगामात तांदळाचे उत्पादन कमी आहे. 2020-21 च्या आर्थिक वर्षांमध्ये भारतात 121.46 दशलक्ष तांदळाचे उत्पादन झालं आहे. पश्चिम, बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब, हरयाणा, तेलंगाणा, छत्तीसगड, बिहार या राज्यांमध्ये तांदळाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.

संबंधित बातम्या:

पंजाब सरकार खासगी रुग्णालयांना वाढीव किमतीला लसी विकतंय, शिरोमणी अकाली दलाचा मोठा आरोप

केरळ सरकारचं एक पाऊल पुढे, 20 हजार कोटींचं पॅकेज जाहीर, लसीकरणावर भर, नवा कर लावणार नाही!

(Hyderabad based company developed paddy rice Hitlar-711 know details about it)