AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert: सिंधुदुर्ग सोलापूरसह राज्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस, गारपीट होण्याची शक्यता

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस महत्त्वाचे असल्याचे सांगत राज्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासाह पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. (weather alert rain in Maharashtra)

Weather Alert: सिंधुदुर्ग सोलापूरसह राज्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस, गारपीट होण्याची शक्यता
पाऊस
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: May 08, 2021 | 1:12 PM
Share

सिंधुदुर्ग: भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे  आहेत. राज्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागनं वर्तविली आहे. त्याप्रमाणं सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं हजेरी लावलीय. हवामान विभागनं सिंधुदर्ग आणि सोलापूरसह विविध जिल्ह्यात आज ही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सिंधुदुर्गमध्ये शुक्रवारी सायंकाळी वादळी वारे आणि विजांच्या लखलखाटासह जोरदार पाऊस कोसळला. हवामान विभागानं राज्यात पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा देखील दिला आहे. (IMD issue alert rain with lightning and thunderstorm in various district of Maharashtra specially Sindhudurg and Solapur)

पावसामुळे शेतकऱ्यांची ताराबंळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. मात्र, खरिप हंगामासाठी शेतीची मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कुडाळ तालुक्यासह कणकवली व वैभववाडी तालुक्याला या पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्याने काही ठिकाणी पडझड झाली व फळपिकांचे मोठे नुकसान झाले.आज ही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.नागरिकांनी त्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आले आहे.

सोलापूरमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई यांच्या अंदाजानुसार 8 मे रोजी सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर 9 ते 11 मे दरम्यान जिल्ह्यात तुरळक प्रमाणात पाऊस होऊ शकतो.

पुढील चार दिवस राज्यासाठी महत्वाचे

भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवस महत्त्वाचे असल्याचे सांगत राज्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच हवामान खात्याने काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाडा येथे पावसाच्या सरी बरसत आहेत. साताऱ्यात काही ठिकाणी गारपीटीसुद्धा नोंद झाली होती. या पार्श्वभूमीवर आता येत्या 1 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सातारा, सागंली, कोल्हापूर, रत्नागिरी, हिंगोली आणि  वाशिम जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

संबंधित बातम्या:

Monsoon | मान्सून 1 जून रोजी केरळात, हवामान विभागाचा अंदाज, राज्यात कुठे-कधी पाऊस?

Weather Alert | विजांच्या कडकडाटासह सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापुरात पूर्वमोसमी पावसाची हजेरी; पुढील 5 दिवस महत्त्वाचे

(IMD issue alert rain with lightning and thunderstorm in various district of Maharashtra specially Sindhudurg and Solapur)

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल