AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon | मान्सून 1 जून रोजी केरळात, हवामान विभागाचा अंदाज, राज्यात कुठे-कधी पाऊस?

यंदा मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Monsoon Hits Kerala Coast at 1 June 2021)

Monsoon | मान्सून 1 जून रोजी केरळात, हवामान विभागाचा अंदाज, राज्यात कुठे-कधी पाऊस?
मुंबईत पाऊस
| Updated on: May 06, 2021 | 1:17 PM
Share

मुंबई : सध्या घामाच्या धारांनी त्रस्त महाराष्ट्रासाठी गुड न्यूज आहे. यंदा मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होईल. तर 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.(Monsoon Hits Kerala Coast at 1 June 2021)

“यंदा कोकणात मान्सून येत्या 1 जून रोजी दाखल होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  येत्या 15 मे आणि 31 मे रोजी पावसाचा अधिकृत अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. मात्र यंदा अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.

स्कायमेटचा अंदाज काय?

स्कायमेटच्या मान्सूनच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यंदाच्या वर्षी देशातील अधिक भागांत सामान्य मान्सून म्हणजेच 96 ते 104 टक्क्याच्या दरम्यानचा पाऊस पडेल. यावर्षी पाऊसकाळ चांगला रहाणार असून मान्सून सामान्य असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. 98 टक्के पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या मे महिन्यात मॉन्सूनबद्दलचा दुसरा अंदाज जाहीर केला जाईल.

कसा असेल मान्सून?

– स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील म्हणाले की, प्रशांत महासागरात गेल्या वर्षभरापासून ला निनाची स्थिती कायम आहे. आणि आतापर्यंत मिळालेले संकेत असा इशारा करतात की, संपूर्ण पावसाळ्यात ही स्थिती राहू शकते. – पावसाळ्याच्या मध्यापर्यंत प्रशांत महासागराच्या मध्यवर्ती भागात पुन्हा समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान कमी होण्यास सुरवात होईल. तथापि, समुद्राच्या पृष्ठभागावर थंड होण्याची ही प्रक्रिया अत्यंत संथ असेल. – या आधारावर, आम्ही असे म्हणू शकतो की मान्सून खराब करणारी अल-नीनो उभरण्याची शक्यता यावर्षीच्या पावसाळ्यात नाही. – मान्सूनवर होणारा आणखी एक महत्त्वाचा महासागरीय बदल म्हणजे सध्या हिंदी महासागरापासून दूर असलेले मेडेन ज्युलियन ओशिलेशन (MJO). – संपूर्ण मान्सून हंगामात तो मुश्किलीने हिंद महासागरातून साधारणपणे 3-4 वेळा जातो. पावसाळ्यावर त्याचा काय परिणाम होईल याबद्दल काही सांगणे घाईचे ठरेल.

(Monsoon Hits Kerala Coast at 1 June 2021)

संबंधित बातम्या : 

कसा असेल यावर्षीचा मान्सून, पाऊसकाळ? स्कायमेटचा हा अंदाज वाचा

ऐन कोरोना काळात गूड न्यूज! यावर्षी चांंगला पाऊसकाळ, सामान्य मान्सूनचा हवामान विभागाचा पहिला अंदाज

फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.