AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सगळंच OK!! मिरचीचा ठसका होणारच! पोषक वातावरण, भरघोस उत्पादन, आमदारांसारखा भावही चढलेलाच!

जालना जिल्ह्यातील शेतकरी हे रेशीम शेतीबरोबरच भाजीपाल्यावरही भर देत आहेत. उन्हाळी हंगामात लागवड केलेली मिरची आता जोमात असून 15 दिवसांवर तोड आली आहे. यंदा लागवडीपासून पोषक वातावरण राहिले असल्याने उत्पादनात वाढ तर होणारच आहे पण बाजारपेठेत हिरव्या मिरचीला मागणीही आहे.

सगळंच OK!! मिरचीचा ठसका होणारच! पोषक वातावरण, भरघोस उत्पादन, आमदारांसारखा भावही चढलेलाच!
मिरची पीकावर मर रोगाचा प्रादुभावर झाल्याने भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार लागवडीची वेळ आली आहे.
| Updated on: Jun 27, 2022 | 11:02 AM
Share

जालना : शेतकऱ्यांनी प्रतिकूल परस्थितीमध्ये (Summer Season) उन्हाळी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी (Chilly) मिरचीची लागवड केली होती. उन्हाळ्यात मुबलक पाणी शिवाय अवकाळीची अवकृपा नसल्याने पोषक वातावरण आणि सध्या बाजारपेठेतील दर यामुळे सर्वकाही ओके असल्याची भावना शेतकऱ्यांची आहे. सध्या शिवसेनेच बंडखोर (Shahaji Patil) आमदार शहाजी बापू पाटील यांचा मोबाईलवरील संवाद मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या संवादाला अनुसरुण जिल्ह्यातील भोकरण तालुक्यातील शेतकरी आपल्या भावना व्यक्त करीत आहे. यंदा मिरचीचा ठसका उठणार हे निश्चित मानले जात असून मराठावाड्यातील मिरचेचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धावडा आणि वालसांगवी भागातील शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार आहे.

..म्हणून आमदारांच्या स्टाईलने मिरचीचे वर्णन

सध्या राज्यात नव्हे देशात बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलेली ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. काय झाडी..काय डोंगार..काय हॉटील…एकदम ओक्केच… हे त्या संवादातील वाक्य आता कशालाही जोडून येत आहे. तोच प्रकार भोकरन तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. पोषक वातावरण, भरघोस उत्पादन, विक्रमी दर मिरचीच्या बाबतीत सर्वकाही ओक्केच.. अस म्हणत शेतकरी हे हिरव्या मिरचीचे उत्पादन होणारा फायदा याबाबत आनंद व्यक्त करीत आहेत.

परराज्यात होते निर्यात

जालना जिल्ह्यातील शेतकरी हे रेशीम शेतीबरोबरच भाजीपाल्यावरही भर देत आहेत. उन्हाळी हंगामात लागवड केलेली मिरची आता जोमात असून 15 दिवसांवर तोड आली आहे. यंदा लागवडीपासून पोषक वातावरण राहिले असल्याने उत्पादनात वाढ तर होणारच आहे पण बाजारपेठेत हिरव्या मिरचीला मागणीही आहे. भोकरन तालुक्यातील मिरची ही दिल्ली, अकोला, अमरावती, नागपूरसह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही निर्यात केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होतो.

सध्या काय आहे दराची अवस्था?

उन्हाळी हंगामातील मिरचीची तोड आता 15 दिवसांवर येऊन ठेपली आहे. अवकाळीचा लहरीपणा नाही की कीड रोगराईचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात वाढ होणार हे निश्चित आहे. शिवाय सर्वच भाजीपाल्याचे दर हे गगणाला भिडलेले आहेत. त्यामुळे हिरव्या मिरचीला सध्या 35 ते 40 रुपये असा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. तोडीला अद्याप आवधी असतानाही व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन मागणी करीत आहे. शिवाय पावसाळ्यात मिरचीची आवक कमी राहिली तर दरात आणखी वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.