AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मला वाटलं मी बाद झालोय…” मैदानावरील नाट्यानंतर स्टीव्ह स्मिथचा खुलासा, पाहा नक्की काय घडलं?

ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर बांगलादेशने अधिराज्य गाजवलं. पण स्टीव्ह स्मिथच्या विकेटसाठी खूपच झुंजावं लागलं. त्याची विकेटही मिळाली होती, पण तंत्रज्ञानामुळे बांगलादेशी खेळाडूंचा हिरमोड झाला.

मला वाटलं मी बाद झालोय... मैदानावरील नाट्यानंतर स्टीव्ह स्मिथचा खुलासा, पाहा नक्की काय घडलं?
"मला वाटलं मी बाद झालोय..." मैदानावरील नाट्यानंतर स्टीव्ह स्मिथचा खुलासा, पाहा नक्की काय घडलं?Image Credit source: Getty Images
| Updated on: Aug 13, 2026 | 9:48 PM
Share

ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना डार्विनमध्ये सुरू आहे. 13 ऑगस्टपासून या सामन्याला सुरूवात झाली असून पहिला बांगलादेशच्या नावावर राहिला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं मायभूमीत खेळपट्ट्यांचा अंदाज असल्याने निर्णय योग्य ठरेल असं वाटलं होतं. पण बांगलादेशने सगळे फासे उलटे पाडले. प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची दाणादाण उडवून दिली. ऑस्ट्रेलियाचा डाव 198 धावांवर आटोपला. तर पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने 1 गडी गमवून 96 धावा केल्या होत्या. पण या सामन्यात बांगलादेशला 64 धावांचा अतिरिक्त भार सहन करावा लागला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. स्टीव्ह स्मिथ 7 धावांवर असताना त्याची विकेट मिळाली म्हणून जल्लोष केला. पंचांचा नकार मिळाल्यानंतर रिव्ह्यूही घेतला. पण सर्वकाही ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात पडलं.

नेमकं काय घडलं आणि स्मिथ काय म्हणाला?

ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 3 गडी गमवून 67 धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून 21वं षटक टाकण्यासाठी एबादोत होसेन आला आणि त्याच्या पहिल्या चेंडूवर कॅमरून ग्रीनने 1 धाव घेत स्टीव्ह स्मिथला स्ट्राईक दिली. त्यानंतर स्टीव्ह स्मिथने दुसरा आणि तिसरा चेंडू निर्धाव घालवला. चौथ्या चेंडूवर खेळताना स्टीव्ह स्मिथ चाचपडला आणि थेट विकेटकीपरच्या हाती चेंडू गेला. आवाज आल्याने बांगलादेशी खेळाडूंनी जोरदार अपील केली. पण पंचांनी नाबाद असल्याचं सांगितलं. खरं तर स्टीव्ह स्मिथ मैदान सोडून जाण्यासही तयार होता. बांगलादेशने रिव्ह्यू घेतल्याने बाद असेल त्याला वाटलं. पण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तपासलं असता नाबाद असल्याचं स्पष्ट झालं. याबाबत पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्टीव्ह स्मिथने स्पष्टीकरणही दिलं.

स्टीव्ह स्मिथने पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेला सामोरं गेला. तेव्हा त्याला त्या घटनेबाबत विचारलं गेलं. स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, मला असंच वाटलं होतं. मी खरंच नशिबवान आहे का? मला असंच वाटतं. कधी कधी तुम्हाला ते स्वीकार करावं लागतं. हे खूप चांगलंही असतं. चेंडूला बॅटला लागला नाही असंही होऊ शकतं. मला माहिती नाही, पण मला नक्कीच काहीतरी जाणवलं होतं. जर मला बाद दिलं असतं तर मी मैदानाबाहेर गेलो असतो. पण मला वाटते की मी आज तंत्रज्ञानामुळे वाचलो.

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...