Cotton Crop : हंगामाच्या अंतिम टप्प्यातही ‘पांढऱ्या सोन्याला’ झळाळी, साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांची ‘चांदी’

| Updated on: Apr 10, 2022 | 10:45 AM

हंगामाच्या सुरवातीपासून कापूस दराच्या बाबतीत झुकलेलाच नाही. शेतीमालाच्या दरातील चढउतार हे ठरलेलेच असतात पण यंदा कापसाने हा विक्रम मोडला आहे. केवळ दरात सातत्यच नाही तर गेल्या 12 वर्षातील विक्रमी दरही यंदाच मिळालेला आहे. खरिपातील पिकांच्या उत्पादनात घट झाली असली तर वाढीव दरामुळे शेतकऱ्यांच्या अर्थार्जनात वाढ झाली आहे. संध्या हंगाम संपल्यात जमा आहे. कारण दरवर्षी दिवाळीत सुरु झालेला हंगाम मार्चमध्ये संपत असतो. आता हंगाम संपत असतानाही 11 हजार 705 रुपये क्विटल असा दर कापसाला मिळत आहे.

Cotton Crop : हंगामाच्या अंतिम टप्प्यातही पांढऱ्या सोन्याला झळाळी, साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांची चांदी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नंदूरबार : हंगामाच्या सुरवातीपासून कापूस दराच्या बाबतीत झुकलेलाच नाही. शेतीमालाच्या दरातील चढउतार हे ठरलेलेच असतात पण यंदा  (Cotton Rate) कापसाने हा विक्रम मोडला आहे. केवळ दरात सातत्यच नाही तर गेल्या 12 वर्षातील विक्रमी दरही यंदाच मिळालेला आहे.  (Kharif Season) खरिपातील पिकांच्या उत्पादनात घट झाली असली तर वाढीव दरामुळे शेतकऱ्यांच्या अर्थार्जनात वाढ झाली आहे. संध्या हंगाम संपल्यात जमा आहे. कारण दरवर्षी दिवाळीत सुरु झालेला हंगाम मार्चमध्ये संपत असतो. आता (Kharif Season) हंगाम संपत असतानाही 11 हजार 705 रुपये क्विटल असा दर कापसाला मिळत आहे. दरवर्षी हंगाम संपत असताना दरता घसरण हे ठरलेले असते. यंदा कापसाच्या बाबतीत हे सूत्र लागूच झाले नाही. उलट ज्या शेतकऱ्यांनी साठवणूक करुन ठेवली त्यांची चांदी झालेली आहे.

नंदूरबार बाजार समितीमध्ये 55 कोटींची उलाढाल

नंदुरबार तालुक्यातील भलेर गावाचे शेतकरी विनायक टोंगल यांच्या कापसाला 11 हजार 705 एवढा विक्रमी दर मिळाला आहे. यावर्षी जवळपास 55 हजार क्विंटल कापसाची विक्री झाली असून यावर्षी 50 ते 55 कोटी रुपयांची उलाढाल नंदूरबार बाजार समितीत झाली आहे. यावर्षी कापसाने शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळवून दिला आहे. नंदूरबार जिल्ह्यात सोबतच जवळ असलेले गुजरात आणि मध्य प्रदेश मधून देखील शेतकरी मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्रीसाठी येथील राजीव गांधी कापूस केंद्रावर विक्रीसाठी दाखल होत असतात त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. या वर्षी सर्वाधिक 50 ते 55 कोटीची उलाढाल झाली झाले असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांपेक्षा आता व्यापाऱ्यांनाही फायदा

हंगामाच्या सुरवातीपासून कापूस दराचा आलेख हा चढता राहिलेला आहे. 7 हजार 500 पासून सुरु झालेले दर आता थेट 11 हजार 700 पर्यंत पोहचलेले आहेत. असे असताना काही शेतकऱ्यांनी हंगामाच्या सुरवातीलाच कमी किंमतीमध्ये कापसाची विक्री केली मात्र, व्यापाऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीवरच भर दिला होता.आता त्याच कापसाचे दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन घेतले असले तरी व्यापाऱ्यांचीही चांदी झाली आहे. खरिपात कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाल्यानेच दर हे टिकून राहिलेले आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करुन योग्य वेळी विक्रीचा निर्णय घेतल्याचा फायदा झाला आहे.

फरदड कापसालाही मोठी मागणी

हंगाम संपल्यानंतर पाणी देऊन कापूस क्षेत्रातून जे उत्पादन घेतले जाते त्याला फरदडचे उत्पादन असे म्हणतात. मात्र, या उत्पादनामुळे शेती क्षेत्राचे नुकसान होते शिवाय इतर पिकांवरही बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. असे असतानाही वाढीव दरामुळे शेतकऱ्यांनी फरदडचे उत्पादन घेणे पसंत केले आहे.

संबंधित बातम्या :

Bhandara : धक्कादायक..! मुबलक पाणी असतानाही उन्हाळी पिकांनी माना टाकल्या, जमिनीलाही भेगा पडल्या, कारण काय?

Onion Crop : आवक घटूनही कांद्याचा वांदाच, खरिपात साधले उन्हाळी कांद्याचे गणितच बिघडले

Income Tax | श्रीमंत शेतकरी प्राप्तीकर विभागाच्या रडारवर; उत्पन्न जास्त असेल तर कर भरावा लागणार?