कधी नव्हे ते सुर्यफूलाच्या क्षेत्रात वाढ, आता वाढीव उत्पादनासाठी ‘असे’ करा व्यवस्थापन..!

| Updated on: Dec 10, 2021 | 3:21 PM

केवळ वातावरणच नाही तर तेलबियांच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांनी सुर्यफूलाला पसंती दिलेली आहे. शिवाय यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने सिंचनाचा प्रश्न मिटलेला आहे. त्यामुळे शेतकरी हे वेगवेगळा प्रयोग करीत आहे. अन्यथा सुर्यफूलाचे पिक हे नामशेष होण्याच्या मार्गावर होते. पण पुन्हा यामध्ये झपाट्याने वाढ झाल्याने आता त्याचे व्यवस्थापन होणेही तेवढेच महत्वाचे आहे.

कधी नव्हे ते सुर्यफूलाच्या क्षेत्रात वाढ, आता वाढीव उत्पादनासाठी असे करा व्यवस्थापन..!
यंदा उन्हाळी हंगामात सुर्यफूलाचे क्षेत्र वाढले आहे.
Follow us on

औरंगाबाद : रब्बी हंगाम म्हणलं की ज्वारी, गहू अन् हरभरा ही ठरलेली पिके. पण यंदा वातावरणातील बदलाप्रमाणे शेतकऱ्यांनी पिक पध्दतीमध्ये बदल केला आहे.  (Marathwada) मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात सरासरीच्या दसपटीने अधिक सुर्यफूलाचा पेरा झाला आहे. केवळ वातावरणच नाही तर (Increase in Oilseeds Prices) तेलबियांच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांनी (Sunflower Crop) सुर्यफूलाला पसंती दिलेली आहे. शिवाय यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने सिंचनाचा प्रश्न मिटलेला आहे. त्यामुळे शेतकरी हे वेगवेगळा प्रयोग करीत आहे. अन्यथा सुर्यफूलाचे पिक हे नामशेष होण्याच्या मार्गावर होते. पण पुन्हा यामध्ये झपाट्याने वाढ झाल्याने आता त्याचे व्यवस्थापन होणेही तेवढेच महत्वाचे आहे. खरीप हंगामात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. पण आता रब्बी हंगामात वेगवेगळे प्रयोग करुन उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न शेतकरी हे करीत आहेत.

आंतरमशागत व पाण्याचे व्यवस्थापन

पेरणीनंतर 15-20 दिवसांनी दोन रोपातील योग्य ते अंतर ठेऊन विरळणी करावी. त्यानंतर एक खुरपणी आणि दोन कोळपण्या कराव्यात. पहिली कोळपणी पेरणीनंतर 20 दिवसांनी व दुसरी कोळपणी 40 दिवसांनी करावी. सुर्यफूलाच्या पिकास संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. जसे की रोप अवस्था, फुलकळी अवस्था आणि फुलोऱ्याची अवस्था. या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात व उत्पादनात घट येते.

असे करा पीकाचे सरंक्षण

विषाणूजन्य रोग हा रस शोषणाऱ्या फुलकिड्यांमार्फत होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी इमिडोक्लोप्रिड 200 एस.एल. 2 मिली10 लीटर पाणी या प्रमाणात पेरणीनंतर 15 दिवसांच्या अंतराने तीन वेळा फवारण्या कराव्यात. मावा व तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट 30 प्रवाही 0.3 टक्के फवारावे. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 1000 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी वापरावे. केवळ अळीच्या नियंत्रणासाठी अळ्यांचे पुंजके वेचून रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा.

सुर्यफूलासाठी ही विशेष बाब

सुर्यफूल हे फुलोऱ्यात असताना सकाळी 7 ते 11 या वेळेत हाताला तलम कापड गुंडाळून फुलाच्या तबकावरुन हळूवार हात फिरवल्यास कृत्रिम परागीभवन होऊन दाणे भरण्याचे प्रमाण वाढते. सुर्यफूलाचे फुल उमलण्याच्या अवस्थेत व त्यानंतर आठ दिवसांनी 2 ग्रॅम बोरॅक्स प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे दाणे भरण्याचे प्रमाण व दाण्याचे वजन वाढते. परागीभवन होण्यासाठी प्रति हेक्टरी 5 मधमांश्याच्या पेट्या ठेवावेत. सुर्यफूल पिकाची फेरपालट करावी. तसेच कडधान्य सुर्यफूल किंवा तृणधान्य सुर्यफूल या प्रमाणे पिकाची फेरपालट करावी. पीक फुलो-यात असताना किटकनाशकाची फवारणी करु नये. अगदीच आवश्यकता असेल तर किटकनाशकाची फवारणी करावी.

संबंधित बातम्या :

Banana Farming : गांधेलीच्या केळीची चवच न्यारी… शेतकऱ्यांचा निर्धार आता ब्रँड करण्याचा..!

सोयाबीनच्या दराने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर, आता साठवणूक ठरणार का फायद्याची?

E-Pik- Pahani : खरिपात मोहीम यशस्वी आता रब्बी हंगामातही शेतकऱ्यांचीच भूमिका महत्वाची