शेतीमालाच्या दराला उतरती कळा, त्यात व्यापाऱ्यांचा अजब कारभार, नेमके काय झाले खामगाव बाजार समितीमध्ये?

| Updated on: Jan 16, 2022 | 12:17 PM

निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील उत्पादन हे घटलेले आहे. असे असताना हंगाम सुरु होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला तरी शेतीमालाला अपेक्षित दर हा मिळालेला नाही. त्यामुळे पिकावर केलेला खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. अशातच तळपायाची आग मस्तकात जाईल असाच प्रकार खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये समोर आला आहे.

शेतीमालाच्या दराला उतरती कळा, त्यात व्यापाऱ्यांचा अजब कारभार, नेमके काय झाले खामगाव बाजार समितीमध्ये?
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
Follow us on

खामगाव : निसर्गाच्या लहरीपणामुळे (Kharif Season) खरीप हंगामातील उत्पादन हे घटलेले आहे. असे असताना हंगाम सुरु होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला तरी (Agricultural Prices) शेतीमालाला अपेक्षित दर हा मिळालेला नाही. त्यामुळे पिकावर केलेला खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. अशातच तळपायाची आग मस्तकात जाईल असाच प्रकार (Khamgaon) खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये समोर आला आहे. येथील बाजार समितीमध्ये थेट उलटेच लिलाव होत असल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून या अजब प्रकरामुळे प्रशासनाकडून संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. बाजार समितीमध्ये चढत्या क्रमाने लिलाव केले जातात पण वेगळाच प्रकार या बाजारस समितीमध्ये आढळून आला असून यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

बाजार समितीमध्ये दर दिवशी शेतीमालाचे लिलाव होतात. सध्या खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस आणि तूरीची आवक सुरु आहे. मात्र, लिलावा दरम्यान, व्यापाऱ्यांनी चढत्या क्रमाणे लिलाव करणे अपेक्षित असते. जसे की, समजा सोयाबीनचे सौदे होत असताना 5 हजार 100..त्यानंतर 5 हजार 200 असे मात्र, हीच गणती व्यापारी उलटी करीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळत नव्हताच पण नुकसान होत होते. ही बाब शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

व्यापाऱ्यांवर कारवाई

बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार दाखल केल्यानंतर बाजार समितीने महालक्ष्मी टेडर्सचे अडते गणेश शंकरराव निमकर्डे यांना तसेच खरेदीदार व्यापारी तुलसी पलसेसचे नितीनकुमार टावरी सह झंवर ब्रदर्स चे शारदा प्रमोद झंवर यांना कारणे दाखवा नोटीसेस बजवल्या होत्या. यात आता शेतमालाचे उलटे लिलाव केल्या प्रकरणी बाजार समिती प्रशासनाने कारवाई करीत एका अडत्याचा परवाना 7 दिवसांकरिता निलंबित केला असून खरेदीदार व्यापाऱ्यांना करणे दाखवा नोटिसेस बजावण्यात आले आहेत. त्यांचे खुलासे आल्यानंतर पुढची कारवाई होणार असल्याचे बाजार समितीचे सचिव मुकुटराव भिसे यांनी सांगितले आहे.

एका शेतकऱ्याची हुशारकी सर्वाच्या फायद्याची

गेल्या काही दिवसांपासून खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असाच प्रकार होत होता. याचा व्हिडीओ एका शेतकऱ्याने करुन हा सर्व काय प्रकार आहे तो बाजार समिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. व्यापाऱ्यांच्या या कारभारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे याची गंभार दखल घेत कारवाई करण्यात आली आहे. बाजार समितीच्या या कारवाईमुळे सध्या लिलाव व्यवस्थित सुरु असून व्यापाऱ्यांच्या खुलाश्यानंतर नेमकी काय कारवाई होणार हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Natural Crisis: निसर्गाचा लहरीपणा त्यात कृषी विभागाची अनास्था, जगाचा पोशिंदा मात्र वाऱ्यावर

Cilantro : पारंपारिक पिकांना कोथिंबीर भारी, बुरशीचा नायनाट अन् उत्पन्नात भर

व्वा रे पट्ट्या..! 2 बिस्कीट पुडे अन् ताक पिऊन अंगी हत्तीच बळ, ऊसतोड कामगाराचा असा ‘हा’ विक्रम तुम्ही होताल अवाक्