Cilantro : पारंपारिक पिकांना कोथिंबीर भारी, बुरशीचा नायनाट अन् उत्पन्नात भर

Cilantro : पारंपारिक पिकांना कोथिंबीर भारी, बुरशीचा नायनाट अन् उत्पन्नात भर
नांदेड जिल्ह्यातील शहापूर परिसरात कोथिंबीरचे क्षेत्र वाढत आहे. पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांना वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे.

खरीप असो वा रब्बी हंगाम बदलत्या वातावरणाचा परिणाम हा प्रत्येक पिकांवर होतच आहे. यातच अवकाळी आणि गारपिटमुळे शेतजमिनीत पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांची वाढ झाली आहे. यामुळे वाढीव उत्पादन तर सोडाच पण जमिनीत गाढलेलं पदरी पडत नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील शहापूर येथील शेतकऱ्यांनी आता पीक पध्दतीमध्येच बदल करण्याचा निर्धार केला आहे.

राजीव गिरी

| Edited By: राजेंद्र खराडे

Jan 16, 2022 | 10:56 AM

नांदेड : खरीप असो वा (Rabi Season) रब्बी हंगाम बदलत्या (Change Climate) वातावरणाचा परिणाम हा प्रत्येक पिकांवर होतच आहे. यातच अवकाळी आणि गारपिटमुळे शेतजमिनीत पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांची वाढ झाली आहे. यामुळे वाढीव उत्पादन तर सोडाच पण जमिनीत गाढलेलं पदरी पडत नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे (Marathwada) मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील शहापूर येथील शेतकऱ्यांनी आता पीक पध्दतीमध्येच बदल करण्याचा निर्धार केला आहे. पारंपारिक पिकांचे यामुळे नुकसान होत असल्याने आता उन्हाळी हंगामात थेट कोथिंबीर लावण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे कोथिंबीर क्षेत्रात वाढ होत आहे. त्यामुळे शेत जमिनीत पसरलेल्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. गेल्या काही दिवसांपासून एकाच पिकांमुळे जमिनीचा पोतही बिघडलेला आहे. त्यामुळे हा प्रयोग सर्वच दृष्टीन फायद्याचा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.

पीक पध्दतीमध्ये बदल गरजेचा

शेत जमिनीत एकच पीक वारंवार घेतल्याने जमिनीचा दर्जा कमी होतो. त्यामुळे उत्पादकता घटते. शिवाय गेल्या वर्षभरातून मराठवाड्यासह राज्यभर निसर्गाचा लहरीपणा कायम आहे. त्यामुळे शेतजमिनीत पाणी साचून राहिल्याचे दुष्परिणाम सध्या दिसून येत आहेत. त्यामुळे तीन वर्षातून एकदा पीक पध्दतीमध्ये बदल करण्याचा सल्ला कृषी विभागाच्या माध्यमातून सातत्याने दिला जातो. मात्र, उत्पादनाच्या दृष्टीकोनातून त्याच पीकाचा आधार शेतकरी घेत होते. पण यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे का होईना पीक पध्दतीमध्ये बदल करावा लागत आहे.

एकरी 8 क्विंटल उत्पादन अन् दरही चांगला

कोथिंबीर हे अल्पावधीचे पीक आहे. शिवाय याकरिता कमी कष्ट आणि पाण्याचीही अधिकची गरज नाही. योग्य व्यवस्थापन केले तर एकरी 7 ते 8 क्विंटलचा उतारा हा धन्याचा मिळतोच. त्यामुळे पारंपारिक पिकांपेक्षा हा चांगला पर्याय आहे. नांदेड जिल्ह्यात कोथिंबीरचे क्षेत्र वाढत आहे. शिवाय याचा उपयोन दैनंदिन केला जात असल्याने मागणीही चांगली राहते. प्रतिक्विंटल एकरी सात ते आठ क्विंटल धन्याचे उत्पादन होत असून प्रतिक्विंटल सरासरी आठ हजारांचा भाव धन्याला मिळतोय. त्यामुळे शहापूर भागात जिकडे नजर तिकडे कोथिंबीरीचे पीक दिसतंय. काळानुरुप शेती पध्दतीमध्ये बदल होत असून तो बदल आता शेतकरी स्वीकारत असल्याचे चित्र आहे.

जमिनीचे आरोग्य सुधारते- जिल्हा कृषी अधिकारी

सातत्याने सोयाबीन , गहू आणि हरभरा हेच पीक शेतकरी जमिनीत घेतात. त्यातून या पिकांवर मर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने जमिनीत बुरशीच्या प्रमाणात वाढ झालीय. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून सुरुवातीला प्रयोग म्हणून शहापुरच्या शेतकऱ्यांनी कोथिंबीरीची लागवड केली. कोथिंबीरीच्या पिकांमुळे बुरशी तर नष्ट झालीच त्यासोबतच जमिनीचा पोत सुधारलाय. अवघ्या नव्वद दिवसाच्या आत कोथिंबीरीपासून धने विक्रीसाठी उपलब्ध होतात, त्यामुळे आता एकट्या शहापूर गावाच्या शिवारात एक हजार एकर पेक्षा अधिक जमिनीवर कोथिंबीरीची शेती केली जात असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी tv9 ला सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

व्वा रे पट्ट्या..! 2 बिस्कीट पुडे अन् ताक पिऊन अंगी हत्तीच बळ, ऊसतोड कामगाराचा असा ‘हा’ विक्रम तुम्ही होताल अवाक्

काय सांगता? ‘या’ कारणास्तव खानदेशातील खरेदी केंद्र बंद, घ्या जाणून

Grape : द्राक्ष बागांवरील संकट कायम, भुरी रोगाच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल वातावरण, असे करा व्यवस्थापन

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें