AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगता? ‘या’ कारणास्तव खानदेशातील खरेदी केंद्र बंद, घ्या जाणून

महासंघाच्या आहे त्या गोदामामध्ये यापूर्वीच खरेदी केलेल्या शेतीमालाचा साठा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा माल हलविण्यात आलेला नाही. आणि हेच कारण आहे येथील खरेदी केंद्र बंद असण्याचे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी दराने मका आणि ज्वारीची विक्री करावी लागत आहे.

काय सांगता? 'या' कारणास्तव खानदेशातील खरेदी केंद्र बंद, घ्या जाणून
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jan 15, 2022 | 8:00 AM
Share

जळगाव : ज्या पध्दतीने सरकारकडून शेतकरी हीताच्या घोषणा होतात त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर होताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी या अनुशंगाने (Marketing Federation) पणन महासंघातर्फे खरेदी-केंद्र सुरु केली जातात. अगदी त्याच पध्दतीने जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे  खरेदी केंद्र सुरु करण्याची परवानगी मिळालेली आहे. पण महासंघाच्या आहे त्या  (warehouse) गोदामामध्ये यापूर्वीच खरेदी केलेल्या (Agricultural Produce) शेतीमालाचा साठा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा माल हलविण्यात आलेला नाही. आणि हेच कारण आहे येथील खरेदी केंद्र बंद असण्याचे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी दराने मका आणि ज्वारीची विक्री करावी लागत आहे. सध्या या तालुक्यात एकही खरेदी केंद्र नसल्याने व्यापारी म्हणतेल त्याच दरामध्ये विक्री केली जाच असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

नोंदणी सुरु खरेदी बंद

शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतीमाल केंद्रावर आणण्यापूर्वीच त्याची नोंद घेतली जाते. यासाठी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नाव नोंदणी करावी लागणार याकरिता 7/12 उतारा, 8 अ, पिकपेरा आणि बॅंकेचे पासबुकची झेरॅाक्स ही खरेदी केंद्रावर जमा करावी लागणार आहे. अशा पध्दतीने रावेर येथील खरेदी संघावर ज्वारीसाठी 256 तर मक्यासाठी 323 शेतकऱ्यांनी नोंद केलेले आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे ती प्रत्यक्ष खरेदी केंद्र केव्हा सुरु होणार याची.

कारभाराबाबत शेतकरी संतप्त

खरेदी केंद्र सुरु करण्यापुर्वीच गोदामाची सोय करणे अपेक्षित होते. मात्र, महसूलच्या पुरवठा विभागाचे कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष राहिलेले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांवर ही सरकारी सोय असताना देखील कमी किंमतीमध्ये शेतीमाल विकण्याची नामुष्की आलेली आहे. गोदामाला जागाच नसल्याने शेतीमाल पडून अशी पहिलीच घटना झाली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासन नेमका काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.

वखार महामंडाळाच्या दोन्ही गोदामात आहे तरी काय?

रावेरी तालुक्यासाठी ठरवून देण्यात आलेल्या दोन्ही गोदामात खरेदी केलेल्या हरभऱ्याची साठवणूक केलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गोदामातील माल हलवण्यातच आलेला नाही. त्यामुळेच सध्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. आठवड्याभरात गोदामाची सोय केली जाणार असल्याचे येथील पुरवठा निरीक्षक अतुल नागरगोजे यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Kharif Season : सोयाबीन, कापसानंतर आता तुरीवर मदार, आवक सुरु दराचे काय?

Natural Farming: देशभरात 43 लाखांहून अधिक शेतकरी करतात सेंद्रिय शेती, ‘हे’ राज्य आहे आघाडीवर

Grape Harvesting : हंगाम सुरु झाला, व्यापारीही दाखल मग द्राक्ष काढणीला कशामुळे लागला ‘ब्रेक’

Follow Us
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक