Watermelon Rate: कलिंगडचाही बाजार उठला, 15 दिवसातच दर निम्म्यावर

| Updated on: Apr 29, 2022 | 9:33 AM

गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा ह्या बंद होत्या. त्यामुळे पिकलं पण कलिंगड विकण्यासाठी शेतकऱ्यांना बाजारपेठच उपलब्ध झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ग्राहकांच्या दारोदारी जाऊन विक्रीचा प्रयत्न केला पण निम्म्याहून अधिकचा माल शेतातच सडला होता. असे असतानाही शेतकऱ्यांनी यंदा कलिंगड लागवड केली शिवाय हंगामाची सुरवातही चांगली झाली पण आता दर झपाट्याने घसरत आहेत.

Watermelon Rate: कलिंगडचाही बाजार उठला, 15 दिवसातच दर निम्म्यावर
कलिंगडची आवक वाढल्याने दरात घसरण सुरु झाली आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

वाशिम : कोरोनामुळे गेल्या 2 वर्षामध्ये झालेले नुकसान यंदा तरी भरुन निघेल असा विश्वास (Watermelon) कलिंगड उत्पादकांना होता. शिवाय (Seasonable Crop) हंगामाची सरुवातही दणक्यात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आवक झालेल्या कलिंगडला प्रति किलो 15 ते 16 रुपये असा दर मिळालाही मात्र, आता (Summer) उन्हाच्या झळा आणि रमजानचा महिना सुरु असतानाही केवळ आवक वाढल्याने दरात घसरण सुरु झाली आहे. लातूर आणि वाशिम येथील ठोक बाजारपेठेत 8 ते 10 रुपये किलो असा दर मिळत आहे. त्यामुळे वाढीव उत्पन्न तर सोडाच पण झालेला खर्चही पदरी पडणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. बाजारपेठेतील अस्थिरतेचा पुन्हा शेतीमालाच्या दरावर परिणाम झाला आहे. यंदा कलिंगडचे क्षेत्र घटले असले तरी रमजान महिन्यामुळे आवक वाढून ही स्थिती निर्माण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

2 वर्ष नुकसानीचीच

गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा ह्या बंद होत्या. त्यामुळे पिकलं पण कलिंगड विकण्यासाठी शेतकऱ्यांना बाजारपेठच उपलब्ध झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ग्राहकांच्या दारोदारी जाऊन विक्रीचा प्रयत्न केला पण निम्म्याहून अधिकचा माल शेतातच सडला होता. असे असतानाही शेतकऱ्यांनी यंदा कलिंगड लागवड केली शिवाय हंगामाची सुरवातही चांगली झाली पण आता दर झपाट्याने घसरत आहेत. त्यामुळे गेल्या 2 वर्षातील नुकसानभरपाई तर सोडाच पण आता झालेला खर्चही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे कोरोनामुळे झालेले नुकसान काय आणि आता घटते दर काय? शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच आहे.

हंगामाची विक्रमी दराने

गेल्या 2 वर्षातील नुकसान पाहता यंदा कलिंगड क्षेत्रात घट झाली होती. यातच कोरोनाचे सर्व निर्बंध शिथील झाल्याने शेतकऱ्यांना मार्केट उपलब्ध झाले. याचा फायदा मार्चपासून आवक सुरु झालेल्या शेतकऱ्यांनाच झाला होता. सुरवातीच्या काळात कलिंगड हे 15 ते 16 रुपये किलोने विक्री होत असत. यातच रमजान महिना वाढत्या उन्हाचा आणखीन फायदा होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण आवक वाढल्याने सर्व चित्रच बदलले आहे.

नोव्हेंबरमध्ये लागवड, फेब्रुवारीपासून आवक

कलिंगड हे हंगामी पीक आहे. केवळ अडीच महिन्यात शेतकऱ्यांच्या पदरी पडते. यंदा तर पोषक वातावरणामुळे कलिंगड जोमात वाढले पण आता घटत्या दराचा फटका बसत आहे. नोव्हेंबर महिन्यात लागवड झालेल्या कलिंगडला अधिकचा दर मिळाला होता. पण रमजान महिन्यात वाढीव दराची अपेक्षा होती ती फोल होताना दिसत आहे. सध्या आवक वाढल्याने 6 ते 8 रुपये किलो असा दर आहे.