कर्नाटकातील सुपरहिरो, पडीक शेतीमध्ये 700 झाडांची लागवड, पाण्यासाठी खोदल्या 5 गुहा

| Updated on: May 01, 2021 | 4:34 PM

शेतकऱ्यानं पडीक जमीनीवर तब्बल 700 वृक्षांची लागवड करुन शेतीचं चित्रचं पालटलं. Karnataka Superhero Mahalingam Nayak

कर्नाटकातील सुपरहिरो, पडीक शेतीमध्ये 700 झाडांची लागवड, पाण्यासाठी खोदल्या 5 गुहा
महालिंगम नायक
Follow us on

बंगळुरु: काही माणसं जिद्द, कष्ट यामधून अनोख काम उभं करतात, असं म्हटलं जातं. कर्नाटकातील अशाच एका व्यक्तीनं कष्टाच्या जोरावर अशक्यप्राय गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. पडीक जमीनीवर तब्बल 700 वृक्षांची लागवड करुन शेतीचं चित्रचं पालटलं. पाण्याच्या शोधासाठी त्यांनी जवळपास पाच गुहा देखील खोदल्या. कष्टाच्या जोरावर हे शक्य करणाऱ्या व्यक्तीचं नाव महालिंगम नायक आहे. (Karnataka Superhero Mahalingam Nayak farmer who grows more than 700 plants on a barren land)

1978 ला मिळाली जमीन

महालिंगम नायक कर्नाटकातील मंगळुरु जिल्हातील एक खेडेगावात वास्तव्यास होते. लोक त्यांना वन मॅन आर्मी म्हणून ओळखतात. कारण, महालिंगम यांनी कष्टाच्या जोरावर पडीक जमिनीचं चित्र बदलून टाकलं आहे. 1978 मध्ये महालिंगम नायक मजूर म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांच्याकडे शेती नव्हती. मात्र, दानशूर माणसानं त्यांना जमीन दान दिली.

जमीन मिळाली पण पाणी नव्हतं

महालिंगम नायक यांना जमीन मिळाली पण ती पूर्णपणे पडीक स्वरुपाची होती. तिथं पाणी देखील नव्हतं. जमीन मिळाली पण पाणी नव्हतं त्यामुळे शेती करण्याचं स्वप्न कसं पूर्ण करायचं हा प्रश्न नायक यांच्यासमोर होता. पैसे खर्च करण्याऐवजी त्यांनी कष्टाच्या जोरावर पाण्याचा शोध घ्यायचं ठरवलं. डोंगराच्या जवळपास शेती असल्यानं महालिंगम नायक यांनी छोट्या छोट्या गुहा खोदायचं ठरवलं. महालिंगम मालकाच्या शेतात राबून आल्यानंतर स्वत:च्या रानामध्ये पाण्यासाठी गुहा खोदायचं काम करायचे. रात्रीच्या वेळी कंदिलाच्या सहाय्यानं ते काम सुरु ठेवायचं. महालिंगम कामामध्ये रमून जायचे की त्यांच्या पत्नीला त्यांना शोधायला यावं लागतं असे. यादरम्यानच्या काळात काही लोकांकडून महालिंगम यांच्या कष्टावर टीका करण्यात आली.

पहिल्या, दुसऱ्या नाही पाचव्या प्रयत्नात यश

महालिंगम नायक यांनी कष्टाच्या जोरावर डोंगराच्या भागात गुहा काढून पाण्याचा शोध घेण्याच प्रयत्न केला. महालिंगम यांचे एक दोन नाही तब्बल चार प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यांना मोठ्या कष्टानं पाचव्या प्रयत्नात पाणी लागलं. पाण्याची उपलब्धता झाल्यानं महालिंगम यांचं नशीब पालटलं. 35 मीटरचं खोदकाम केल्यानंतर महालिंगम यांना पाणी लागलं. उन्हाळ्याच्या दिवसात जवळपास 6 हजार लीटर पाणी दिवसाला मिळते हे पाणी सिमेंटच्या टाकीत साठवून ते शेतीसाठी वापरलं. ट

700 झाडांची लागवड

महालिंगम नायक आणि त्यांच्या पत्नीनं पडीक जमिनीवर वास्तव्य केले. 35 वर्षांच्या या प्रवासात महालिंगम यांनी पडीक जमिनीचं चित्र बदलून टाकलं. कष्टाच्या जोरावर हे सर्व उभं करणाऱ्या महालिंगम नायक यांना ते परिसरातील लोक जादुई व्यक्ती म्हणतात.

संबंधित बातम्या:

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परवड सुरुच,अवकाळी पावसानं हातातला घास मातीमोल होण्याचं संकट

पुण्याच्या संस्थेकडून सोयाबीनच्या नव्या वाणाची निर्मिती, एका हेक्टरमध्ये 39 क्विंटल उत्पादन मिळणार

(Karnataka Superhero Mahalingam Nayak farmer who grows more than 700 plants on a barren land )