कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परवड सुरुच,अवकाळी पावसानं हातातला घास मातीमोल होण्याचं संकट

अवकाळी पावसाने शुक्रवारी संध्याकाळी जोरदार हजेरी लावल्याने कांद्यासह शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे. onion producer farmers

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परवड सुरुच,अवकाळी पावसानं हातातला घास मातीमोल होण्याचं संकट
कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 3:29 PM

नाशिक: कांदा उत्पादकांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. कोरोनामुळे लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद आहेत. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने शुक्रवारी संध्याकाळी जोरदार हजेरी लावल्याने कांद्यासह शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. ( Nashik Lasalgaon onion producer farmers facing problems due to unseasonal rain)

शेतकऱ्यांची धावपळ

गेले दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण होते हवेत कमालीचा उकाडा असून पाऊस झाला नाही. पण, शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला. लासलगावसह परिसरातील गावात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली दुपारपर्यंत कडक ऊन होते. अचानक आलेल्या पावसाने बळीराजाचे काढलेला शेतीमाल झा कण्यासाठी एकच धावपळ उडाली.

कांद्याची काढणी, पावसाची हजेरी संकट वाढवणारी

शेतात उभे असलेले पीक आणि ठिकठिकाणी सध्या कांद्याच्या पिकाची काढणी सुरू आहे. अचानक पाऊस सुरू झाल्याने तीन ते चार महिने पोटच्या मुलाप्रमाणे संभाळ केलेली पिके डोळ्यादेखत भिजल्यानं झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. कांद्याच्या पिकाचे प्रतवारी घसरणार असून उत्पादन खर्चही निघणे मुश्कील होणार आहे.

कांद्याची मागणी घटली

कोरोना महामारी सुरु असल्याने कांद्याला मागणी घटली आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजार भावात कमालीची दररोज घसरण होत आहे. त्यामुळे कुटुंब चालवावे कसे असा प्रश्न आता कांदा उत्पादक शेतकर्‍यांसमोर उभा राहिला आहे. आता कांदा उत्पादक शेतकर्यांकडे केंद्र व राज्य सरकारने लक्ष देण्याची मागणी मंगेश गवळी आणि संदेश गवळी यांनी केली आहे .

संबंधित बातम्या:

आधी कोरोनाचा फटका, आता नवं संकट, थंडीतही अंडे आणि चिकनच्या किमती कमी होण्याचं कारण काय?

रद्दी देता का रद्दी; रद्दीच्या टंचाईमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल

( Nashik Lasalgaon onion producer farmers facing problems due to unseasonal rain)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.