पुण्याच्या संस्थेकडून सोयाबीनच्या नव्या वाणाची निर्मिती, एका हेक्टरमध्ये 39 क्विंटल उत्पादन मिळणार

पुण्यातील आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट संस्थेने सोयाबीनच्या नव्या वाणाची निर्मिती केलीय. Pune ARI soybean variety

पुण्याच्या संस्थेकडून सोयाबीनच्या नव्या वाणाची निर्मिती, एका हेक्टरमध्ये 39 क्विंटल उत्पादन मिळणार
आहारात सोयाबीनचा समावेश करा आणि विविध व्याधी दूर पळवा
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 10:49 AM

पुणे: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय संशोधकांनी सोयाबीनचं नवं वाण तयार केलं आहे. या वाणाचा नाव MACS 1407 हे आहे. पुणे येथील संशोधन संस्थेने सोयाबीनच वाण तयार केलं आहे. या वाणाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना एका हेक्टरमध्ये 39 क्विंटल सोयाबीनंचं उत्पादन होऊ शकतं, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना एमएसीएस 1407 वाणाचं बियाणं पुढील हंगामापासून उपलब्ध होणार आहे. (Pune based ARI developed New high yielding pest-resistant soybean variety farmers will get from next year)

शेतकऱ्यांना बियाणं कधी मिळणार?

पुण्यातील आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटनं या वाणाची निर्मिती आणि संशोधन केलं आहे. ही संस्था भारत सरकारच्या इंडियन काऊन्सिल ऑफ अ‌ॅग्रीकल्चर रिसर्च संस्थेअतर्गत काम करते. सोयाबीनच्या एमएसीएस 1407 या वाणाबद्दल केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना या वाणाचं बियाण 2022 च्या खरिप हंगामासाठी उपलब्ध होईल, असं सांगण्यात आलं आहे.

वाणाची निर्मिती कशी झाली?

सोयाबीनच्या या वाणाची निर्मिती क्रॉस ब्रीडिंग टेक्ननोलॉजीद्वारे तयार करण्यात आलीय. या वाणाची लागवड केल्यास 39 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन मिळू शकतं. याशिवाय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सोयाबीनचं हे वाण गर्डल बीटल, लीफ माईनर, लीफ रोलर, स्टेम फ्लाई, एफिडस, व्हाईट फ्लाई आणि डिफोलिएटर्स या कीटकांपासून संरक्षित आहे, असा दावा करण्यात आला आहे.

सोयाबीनची पेरणी कधी करावी?

पुण्यातील आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटनं दिलेल्या माहितीनुसार एमएसीएस 1407 वाणाच्या बियाण्याची पेरणी 20 जून ते 5 जुलै दरम्यान करता येईल. जर या काळात पेरणी केली तर पिकाला हानी पोहोचणार नाही. पेरणीनंतर 43 व्या दिवशी सोयाबीनच्या झाडांना फुले येतील. पेरणी झाल्यानंतर 104 दिवस झाल्यानंतर पिकाची कापणी करता येईल. सोयाबीनमध्ये 20 टक्के तेल, 41 टक्के प्रोटीन मिळतं. सरकारी आकडेवारीनुसार गेल्या वर्षी 137.11 लाख टन सोयाबीनचं उत्पादन झालं होतं.

सोयाबीनच्या नव्या वाणाची पेरणी देशभरात सगळीकडे करता येईल. विशेषता आसाम, पश्चिम बंगाल, झारखंड आणि छत्तीसगड राज्यात हे वाण परिणामकारक ठरेल, असा अंदाज आहे.

संबंधित बातम्या:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दोन वर्षात किती पैसे मिळाले?

Farmer Protest : 26 मार्च रोजी शेतकरी संघटनांकडून भारत बंदची हाक, 19 मार्चला ‘मंडी बचाओ-खेची बचाओ’ दिन

(Pune based ARI developed New high yielding pest-resistant soybean variety farmers will get from next year)

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.