Nashik : खरिपातील पिके पाण्याखाली, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

| Updated on: Jul 12, 2022 | 9:36 AM

लासलगावसह जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच अधिकतर शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेऊन पेरण्या उरकत्या घेतल्या. मात्र, पेरणी होताच सुरु झालेला पाऊस आता 8 दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे शेतामध्ये पाणी साचून राहिले आहे. पेरणी होताच अधिक पाऊस झाला तर पिकांची वाढ तर खुंटतेच पण पिके ही पिवळी पडायला लागतात.

Nashik : खरिपातील पिके पाण्याखाली, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने पिके पाण्यात आहेत. दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

लासलगाव : 15 दिवसांपूर्वी पावसाविना (Kharif Season) खरीप हंगाम हातचा जाणार अशी स्थिती होती तर आता (Kharif Crop) खरिपातील सर्वच पिके ही पावसाने साचलेल्या पाण्यात आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा कायम फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे. यंदा उशिरा झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी अल्पावधीच खरिपाच्या पेरण्या उरकून घेतल्या. शिवाय समाधानकारक पाऊस आणि पोषक वातावरणामुळे पिकांची उगवणही झाली. मात्र, उगवण होताच नाशिक जिल्ह्यामध्ये असा काय (Heavy Rain) पाऊस झाला आहे की, सर्वच पिके सध्या पाण्यात आहेत. शेताला तळ्याचे स्वरुप आले आहे. खरिपातील पिके ही पावसळ्यातीलच असतात मात्र, उगवण होताच शेतामध्ये साठलेले पाणी हे धोकादायक आहे. त्यामुळे कांदा, मूग, भुईमूग, बाजरी ही पिके सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशीच स्थिती राहिली तर मात्र, दुबार पेरणी शिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय राहणार नाही.

या पिकांना सर्वाधिक धोका

लासलगावसह जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच अधिकतर शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेऊन पेरण्या उरकत्या घेतल्या. मात्र, पेरणी होताच सुरु झालेला पाऊस आता 8 दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे शेतामध्ये पाणी साचून राहिले आहे. पेरणी होताच अधिक पाऊस झाला तर पिकांची वाढ तर खुंटतेच पण पिके ही पिवळी पडायला लागतात. लासलगाव तालुक्यात तर शेतामध्ये पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे कांदा आणि भुईमग याला सर्वाधिक धोका आहे. या भागात सोयाबीनचा अधिक पेरा नसला तरी शेतातल्या आणि कांदा चाळीत साठवलेल्या कांद्याचा असे दुहेरी नुकसान सध्या सुरु आहे.

5 दिवसांपासून संततधार

केवळ नाशिक जिल्ह्यातच नाहीतर सबंध राज्यात मान्सून सक्रीय झाल्याचे चित्र आहे. हवाहवासा असलेला पाऊस चार दिवसांमध्येत नकोसा झाला आहे. निफाड तालुक्यात तर गेल्या 5 दिवसांपासून संततधार सुरु आहे. त्यामुळे शेती कामे तर सोडाच पण जागोजागी पाणी साचून राहिले आहे. शिवाय नाशिक जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे. त्यामुळे आणखी किती दिवस पावसामध्ये सातत्य राहणार हे स्पष्ट नाही. परंतु, दिवस उजाडताच सुरु होत असलेला रिमझिम पाऊस दिवसभर कायम राहत आहे. त्यामुळे पिके पाण्यात आहेत.

हे सुद्धा वाचा

दुबारमुळे होणार दुहेरी नुकसान

अधिकच्या पावसामुळे जर दुबार पेरणीचे संकट ओढावले तर मात्र शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे. यंदा बी-बियाणांसह खताच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे दुबार पेरणीसाठी पुन्हा अधिकच्या किंमतीने बियाणांसाठी खर्च करावा लागणार. शिवाय बाजारपेठेत बियाणे उपलब्ध होणार की नाही हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. तर दुसरीकडे आगोदरच खरिपाच्या पेरण्यांना उशीर झालेला आहे. 15 जुलैपर्यंत पेरण्या झाल्या तर सरासरी एवढे उत्पादन ममिळते अशा कृषी विभागाचा अंदाज आहे. दुबार पेरणीसाठी पावसामुळे उशीर झाला तर खर्च करुनही काय उपयोग अशी स्थिती आहे.