AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chickpea Crop : हमी भावाचा आधार संपला, आता दर्जेदार हरभऱ्यालाच मागणी

राज्यातील खरेदी केंद्र बंद होऊन महिना उलटला आहे. हमीभावापेक्षा कमी दर असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीवरच भर दिला आहे. यातच आता हरभरा डाळीच्या मागणीत वाढ होऊ लागल्याने दरही सुधारत आहेत. पण प्रक्रिया उद्योजकांकडून जाड हरभरा वाणाचीच मागणी होत आहे. याच वाणाचा हरभरा कमी असल्याने मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत होऊ लागल्याने विशिष्ट हरभऱ्यालाच चांगला दर मिळत आहे.

Chickpea Crop : हमी भावाचा आधार संपला, आता दर्जेदार हरभऱ्यालाच मागणी
आता चांगल्या प्रतिच्या हरभऱ्यालाच चांगला दर मिळत आहे.
| Updated on: Jul 11, 2022 | 4:19 PM
Share

लातूर : यंदा (Rabbi Season) रब्बी हंगामात हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन झाले पण शेतकऱ्यांना त्यामधून अपेक्षित उत्पन्न काही पदरी पडले नाही. राज्यात (Guarantee Rate) हमीभाव केंद्र सुरु झाली ते देखील मर्यादीत काळासाठी.  (Nafed) नाफेडने उद्दिष्टपूर्ती झाली की 8 दिवस आगोदरच हमीभाव केंद्र ही बंद केली. आता शेतकऱ्यांकडे केवळ खुल्या बाजारपेठेचा पर्याय आहे. शिवाय येथे दर्जेदार हरभऱ्यालाच अधिकचा दर आहे. यामध्ये स्थानिक वाणाच्या हरभऱ्याचे दर स्थिर आहेत तर जाड हरभरा वाणाला अधिकचा दर आहे. त्यामुळे भरघोस उत्पादन होऊनदेखील दरामुळे शेतकऱ्यांच्या समस्या ह्या कायम आहेत. हरभरा डाळ आणि बेसणाच्या मागणीत वाढ झाल्याने किमान दरात किंचित वाढ होत असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे.

साठा मर्यादित, मागणीत वाढ

राज्यातील खरेदी केंद्र बंद होऊन महिना उलटला आहे. हमीभावापेक्षा कमी दर असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीवरच भर दिला आहे. यातच आता हरभरा डाळीच्या मागणीत वाढ होऊ लागल्याने दरही सुधारत आहेत. पण प्रक्रिया उद्योजकांकडून जाड हरभरा वाणाचीच मागणी होत आहे. याच वाणाचा हरभरा कमी असल्याने मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत होऊ लागल्याने विशिष्ट हरभऱ्यालाच चांगला दर मिळत आहे. अधिक क्षेत्रावर साध्या वाणाच्या हरभऱ्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे सर्रास शेतकऱ्यांना 4 हजार 500 याप्रमाणेच हरभऱ्याची विक्री करावी लागत आहे.

नाफेड कडूनही विक्रीला सुरवात, दरावर काय परिणाम

हंगामाच्या सुरवातीला नाफेडकडून हरभऱ्याची खरेदी करण्यात आली होती. मात्र, गतमहिन्यात राज्यभरातील खरेदी केंद्र हे उद्दिष्टपूर्ण झाल्यामुळे बंद करण्यात आले होते. आता नाफेडनेच हरभरा बाजारात आणला आहे. नाफेडकडून चांगल्या प्रतीचा असा 26 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आला होता. आता या हरभऱ्याच्या विक्रीचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, विक्री ही मर्यादित स्वरुपात होणार असल्याने त्याचा बाजारपेठेतील दरावर काही परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

असे आहेत बाजार समितीमधील दर

आता साठवणूकीतील हरभरा शेतकऱ्यांकडे आहे. शिवाय संपूर्ण हंगामात हरभऱ्याला दर कमीच राहिलेला आहे. असे असताना आता आवक आणि दर दोन्हीही घटलेले आहेत. सध्या कल्याण बाजार समितीमध्ये हरभऱ्याला 5 हजार ते 7 हजार रुपये क्विंटल असा दर आहे. शहादा 3 हजार ते 7 हजार 300, जळगाव 8 हजार ते 8 हजार 100 रुपये, अकोला 4 हजार 250 ते 4 हजार 450 रुपये तर अमरावती बाजार समितीमध्ये 4 हजार 200 ते 4 हजार 400 रुपये असा दर आहे.

खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.