शेतकऱ्यांना डबल धनलाभ? पीएम किसानसोबत नमोचाही हप्ता? 30 ऑक्टोबरची अपडेट काय?

Namo Shetkari Installment: पीएम किसान योजनेचा निधी 30 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9 वा आणि 10 वा हप्ता थकलेला आहे. तो सुद्धा त्याच दिवशी मिळणार का?

शेतकऱ्यांना डबल धनलाभ? पीएम किसानसोबत नमोचाही हप्ता? 30 ऑक्टोबरची अपडेट काय?
शेतकऱ्यांना डबल धनलाभ? पीएम किसानसोबत नमोचाही हप्ता?
| Updated on: Oct 27, 2026 | 1:09 PM

PM Kisan Yojana 24th Installment: पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर रोजी मिळणार आहे. ई-केवायसी आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतील. पण नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9 वा आणि 10 वा हप्ता थकलेला आहे. दुष्काळाच्या झळा बसत असताना शेतकऱ्यांकडून नमो योजनेतील 4 हजार रुपयांची मागणी करण्यात येत आहे. हा हप्ता सुद्धा 30 ऑक्टोबर रोजी बँक खात्यात जमा होणार का?

तीन दिवसांनी हप्ता खात्यात जमा

Loading...

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 24 वा हप्ता तीन दिवसांनी मिळणार आहे. योजनेतंर्गत 30 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहे. हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरीत करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता वितरीत करण्यात येणार आहे. 20 जून 2026 रोजी सरकारने 23 वा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केला होता.

दरवर्षी केंद्र सरकार पीएम किसान योजनेतंर्गत तीन हप्त्यात 6 हजार रुपये जमा करते. यातंर्गत 89.48 लाख शेतकऱ्यांना 1 हजार 796 कोटी रुपयांचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे, बँक खाते आधार कार्डशी जोडणे आणि ई-केवायसी प्रमाणिकरण या तीन अटी पूर्ण करणाऱ्या शेतकर्‍यांना 24 वा हप्ता प्राप्त होईल. त्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतील.

नमो शेतकरी योजनेचा हप्ता

नमो शेतकरी योजनेचे नववा आणि दहावा हप्ता प्रलंबित आहेत. या दोन्ही हप्त्यांसाठी 3,700 कोटींची गरज आहे. या निधीसाठी मार्च आणि जुलै महिन्यात प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. पण त्याला अद्याप मंजूरी मिळाली नाही. नमो योजनेचे चार हजार रुपये जमा व्हायची प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे. ही रक्कमही दिवाळीच्या दरम्यान मिळाली तर शेतकऱ्यांना पीएम किसानचे दोन हजार, दुष्काळाची मदत पाच हजार आणि नमोचे चार हजार असे एकूण 11,000 रुपयांची मदत मिळेल. त्यांना दिवाळीच्या काळात मोठा आर्थिक हातभार लागेल. पण अद्याप सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या निधी वितरणाविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us