40 रुपयांनी सौदा झाला होता, आता 3 रुपयांनी सुद्धा कुणी घेईना; आमच्या सारखं कुणाच्या वाट्याला नको यायला, बळीराजा उद्विग्न

| Updated on: Mar 20, 2023 | 4:04 PM

आमच्या सारखा संघर्ष आणि दु:ख कुणाच्या वाट्याला नको यायला, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या द्राक्ष बागेला कवडीमोल भावाने सुद्धा कोणी घेत नसल्याने द्राक्ष पंढरी हळहळली आहे.

40 रुपयांनी सौदा झाला होता, आता 3 रुपयांनी सुद्धा कुणी घेईना; आमच्या सारखं कुणाच्या वाट्याला नको यायला, बळीराजा उद्विग्न
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. त्यामध्ये काही ठिकाणी गारपीट ही झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. अद्यापही काही ठिकाणी शेतमालाच्या नुकसानीची पंचनामा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतही मिळणं अवघड झाले आहे. खरंतर खरीपाचे पीक मुसळधार पावसाने मातीमोल केलेले असतांना पुन्हा खरीपाचे पीक काढणीला आलेले असतांना अवकाळी पाऊस पडल्याने पुन्हा नुकसान झाले आहे. त्यामध्ये द्राक्ष उत्पादकाची परिस्थिती पाहिल्यास अनेकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेतमालाची स्थिती पाहून बळीराजा रडकुंडीला आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा द्राक्ष बाग काढणीला आला होता. अनेक व्यापाऱ्यांनी येऊन भाव येऊन ठरवला होता. साधारणपणे चाळीस रुपये भाव ठरविला होता. त्यात आता दोनदा अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्ष बागाचे मोठे नुकसान झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले आहे. जो द्राक्ष बाग चाळीस रुपयांनी सौदा केलेला असतांना तो आता 3 रुपयांनी सुद्धा कुणी घ्यायला तयार होत नाहीये. त्यामध्ये मनुका करण्यासाठी सुद्धा कुणी व्यापारी घेत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे हा द्राक्ष कुणी घ्यायला तयार नसल्याने बळीराजा अश्रु ढाळत आहे.

हे सुद्धा वाचा

एकरी लाखो रुपये खरच करून हाती काही हजार रुपये येणार असल्याचे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामध्ये विशेष बाब म्हणजे द्राक्ष मण्यांना तडे जाऊ लागले आहे. काही द्राक्ष घडातून खळी पडत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अक्षरशः फोन बंद करून ठेवल्याची स्थिती आहे.

अवकाळी पाऊस पडल्याने बाहेरील द्राक्ष निर्यात होत नाहीये, द्राक्षाला मागणी अचानक घटली आहे. त्यामुळे द्राक्ष निर्यात कुठे करायचे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला द्राक्ष बाग यंदाच्या वर्षीही तोट्यात गेल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. अवघ्या तीन रुपये किलोला कुणीही घेत नसल्याचे चित्र आहे.

त्यामुळे नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या वाट्याला जे दु:ख आले आहे ते कुणाच्याही वाट्याला नको यायला अशी उद्विग्न प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहे. त्यामध्ये पुन्हा त्याच क्षमतेने लढण्याचा आशावाद शेतकरी व्यक्त करत आहे. त्यामुळे नाशिकमधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जो परिस्थिती पाहत आहे. त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाहीये.