PM Kisan Mandhan Scheme : शेतकऱ्यांनाही आता पेन्शन, अर्ज करा अन् योजनेत सहभागी व्हा

| Updated on: Feb 07, 2022 | 10:34 AM

शेतकऱ्यांना केवळ शेतीमालाचाच आधार असतो. या व्यतिरिक्त कमावण्याचे दुसरे कोणते साधन नाही की, कोणती पेन्शन. मात्र, केंद्र आणि राज्य सरकार कायम शेतकरी हीताच्या योजना राबवण्यावर भर देत आहे. यामध्ये अल्पभूधारक शेतकरीच सरकारी योजनांच्या केंद्रस्थानी आहे. शेती उत्पादन वाढीबरोबरच इतर माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकास व्हावा या दृष्टीने पीएम किसान मानधन योजना ही सुरु करण्यात आली आहे.

PM Kisan Mandhan Scheme : शेतकऱ्यांनाही आता पेन्शन, अर्ज करा अन् योजनेत सहभागी व्हा
पीएम किसान योजना
Follow us on

मुंबई : शेतकऱ्यांना केवळ शेतीमालाचाच आधार असतो. या व्यतिरिक्त कमावण्याचे दुसरे कोणते साधन नाही की, कोणती पेन्शन. (Central Government) मात्र, केंद्र आणि राज्य सरकार कायम (Farmer) शेतकरी हीताच्या योजना राबवण्यावर भर देत आहे. यामध्ये अल्पभूधारक शेतकरीच सरकारी योजनांच्या केंद्रस्थानी आहे. शेती उत्पादन वाढीबरोबरच इतर माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकास व्हावा या दृष्टीने (PM Kisan Maandhan Yojana) पीएम किसान मानधन योजना ही सुरु करण्यात आली आहे. सध्या कोट्यावधी शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन स्वरुपात मिळणार आहेत. म्हणजेच वर्षाला 36 हजार रुपये. सध्या शेती व्यवसयात बदल होत आहे. शिवाय उत्पादनात देखील वाढ होत आहे. पण शेतकऱ्यांना भरवश्याचे उत्पन्न असे काही नाही. त्यामुळे सरकारी नौकरदाराप्रमाणे त्यालाही पेन्शन मिळावी या हेतूने ही योजना सुरु करण्यात आली आहे. सरकार शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना चालवते. केंद्र सरकार अशीच योजना राबवत असून त्यात शेतकऱ्यांना दरवर्षी ३६ हजार रुपये मिळतात. ही रक्कम अन्नदात्यांना पेन्शन म्हणून दिली जाते. या योजनेचा लाभ देशातील कोट्यवधी अन्नदाते घेऊ शकतात.

पेन्शन मिळणार पण या आहेत अटी-नियम

पीएम किसान मानधन योजनेमध्ये कोणत्याही शेतकऱ्यास सहभाग घेता येणार आहे. यामध्ये सहभाग नोंदवल्यानंतर त्याच्या 60 वर्षापासून पुढे महिना 3 हजार म्हणजेच वर्षाला 36 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. मात्र, याकरिता शेतकऱ्यांना प्रीमीयम अदा करावा लागणार आहे. पंतप्रधान किसान मानधन योजनेअंतर्गत पेन्शन मिळण्यासाठी शेतकऱ्याचे वय 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे. या योजनेत त्यांना दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागणार आहेत. यानंतरच शेतकऱ्यांना 60 वर्ष पूर्ण झाल्यावर दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.

काय आहे सरकारचा उद्देश?

शेती उत्पादनाशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरे कमाईचे साधन नसते. शिवाय वृध्दापकाळात शेतकऱ्यांचे जीवन हालाकीचे होते. या पैशातून शेतकरी आपले वृद्धापकाळ आर्थिकदृष्ट्या मजबूत करू शकतात. केंद्र सरकारच्या या योजनेसाठी शेतकऱ्यांचे वय 18 ते 40 वर्षे असण्याबरोबरच त्यांच्याकडे खतवणी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वयाचा दाखला, उमेदवार शेतकरी हा गरीब व अल्पभूधारक असावा. याशिवाय शेतकऱ्याचेही बँक खाते असणे गरजेचे आहे.

पंतप्रधान किसान मानधन योजनेसाठी अर्ज कसा करावा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला प्रथम त्याच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (सीएससी) जावे लागणार आहे. यानंतर तेथे सर्व कागदपत्रे सादर करून बँक खात्याची माहिती द्यावी लागणार आहे. कॉमन सर्व्हिस सेंटर आधार कार्डला तुमच्या अर्जाशी जोडेल. यानंतर तुम्हाला किसान कार्ड पेन्शन अकाउंट नंबर दिला जाईल. नंतर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या योजनेसाठी स्वत:ची नोंदणी करू शकता.

संबंधित बातम्या :

Photo: रब्बी पिकांनी शिवार बहरला, पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढीची अपेक्षा

हरभरा उत्पादन वाढीची सोपी पध्दत, तंत्रज्ञान वापराचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा, वाचा सविस्तर

शेतीमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांना आधार, यंदा प्रथमच 37 कोटींचे कर्जाचे वितरण