Onion Price : कांद्याने शेतकऱ्यांचा केला वांदा, बाजारभावात इतक्या रुपयांची मोठी घसरण
कांद्याच्या दरात आज मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना डोक्याला हात मारुन घेण्याची वेळ आहे. कांद्याचे भाव घसरल्याने पुन्हा एकदा बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे.
उमेश पारीक, लासलगाव : आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव ( Lasalgaon ) बाजार समितीत गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या बाजार भाव 480 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. कांद्याचे ( Onion Price ) जास्तीजास्त बाजार भाव एक हजार रुपयांच्या आत आल्याने उत्पादन खर्च तर दूर वाहतूक आणि मजुरी निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळच्या सत्रात 700 वाहनातून 13 हजार 500 क्विंटल कांद्याची आवक विक्रीसाठी दाखल झाली. कांद्याला जास्तीजास्त 901 रुपये, कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 650 रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. कांद्याने पुन्हा एकदा वांदा केल्याचं शेतकरी म्हणत आहेत.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

