Heavy Rain : साताऱ्यात भात लागवडीची लगबग, जुलैच्या अंतिम टप्प्यात साधले जाणार उद्दिष्ट..!

| Updated on: Jul 17, 2022 | 5:04 PM

गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य राहिल्याने शेत शिवरात पाणी साचले आहे. भात लागवड ही शेतामध्ये पाणी साचले असतानाच केली जाते. त्यामुळे गुडघाभर पाण्यात शिरुन शेतकरी भात लागवड करीत आहे. अथक परिश्रम असतानाही शेतकऱ्यांचा उत्साह मात्र कायम आहे. शिवाय जुलैच्या अखेरपर्यंत खरिपातील पेरण्या उरकून घेण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्यामुळे पावसाने उघडीप दिली की शेती कामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.

Heavy Rain : साताऱ्यात भात लागवडीची लगबग, जुलैच्या अंतिम टप्प्यात साधले जाणार उद्दिष्ट..!
समाधानकारक पावसामुळे भात लागवडीला वेग आला आहे. सातारा जिल्ह्यातील कण्हेर गाव परिसरात भात लागवडीची लगबग सुरु झाली आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

सातारा : सलग 10 दिवस झालेल्या पावसाचा परिणाम हा (Kharif Season) खरीप हंगामातील पेरणीवर झाला असला तरी याच पावसामुळे पेरणीसाठी पोषक वातावरणही तयार झाले आहे. (Paddy Crop) भात लागवडीसाठी आवश्यक असलेला पाऊस जिल्ह्यात बरसला असून आता भात लागवडीची कामे जोमात सुरु आहेत. शिवाय पावसामुळे शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला आहे. सध्या पावसाची उघडझाप होत असल्यामुळे भात लावणीला वेग आला आहे. तर इतर खरीप पिकांनाही जीवदान मिळाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे (Kharif Sowing) पेरणीचे गणित हुकले असले तरी आता उत्पादन वाढीच्या अनुशंगाने शेतकरी प्रयत्न करताना दिसत आहे. गत महिन्यात पेरणी झालेल्या पिकांचा मशागत तर नव्याने भात लागवड ही कामे जोमात सुरु आहेत.

शेत शिवारात पाणी अन् शेतकऱ्यांचा उत्साह

गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य राहिल्याने शेत शिवरात पाणी साचले आहे. भात लागवड ही शेतामध्ये पाणी साचले असतानाच केली जाते. त्यामुळे गुडघाभर पाण्यात शिरुन शेतकरी भात लागवड करीत आहे. अथक परिश्रम असतानाही शेतकऱ्यांचा उत्साह मात्र कायम आहे. शिवाय जुलैच्या अखेरपर्यंत खरिपातील पेरण्या उरकून घेण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्यामुळे पावसाने उघडीप दिली की शेती कामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.

भात लागवडीचे साधले जाणार उद्दिष्ट

पावासाचा परिणाम उडीद, मूग या पिकांवर झालेला आहे. आता यांचा पेरा झाला तरी उत्पादनात घट ही ठरलेलीच आहे. त्यामुळे शेतकरी आता केवळ सोयाबीनवर भर देत आहे. दुसरीकडे भात लागवड ही जुलैच्या अंतिम टप्प्यापर्यंत केली तरी उत्पादनावर त्याचा परिणाम होणार नाही. त्यामुळे पावसाने उघडीप देताच पुन्हा खरिपातील कामांना वेग आला आहे. लागवड अशीच सुरु राहिली तर सरासरीचे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

चारसूत्री पध्दतीने लागवड

भाताची लागवड करताना दोन्ही रोपांमधील अंतर 15*25 सेंटीमाटर ते 15*25 असे ठेवावे लागणार आहे. प्रत्येक सरीमध्ये आलटूनपालटून असेच अंतर ठेवणे गरजेचे आहे. भात लागवडीसाठी चिखलणी करताना गिरिपुष्पाची हिरवी पाने मिसळावीत. सुधारित लावणी दोरीवर 15 सें.मी. अंतरावर असलेल्या प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. अंदाजाने 15 सें.मी. पुढे आणखी तिसरा व चौथा चूड लावावा.