PM Kisan Yojana: पीएम किसान निधीचा 24 वा हप्ता येण्यापूर्वी करा हे काम, जाणून घ्या अपडेट
PM Kisan Yojana 24th installment: पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पण काही शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा होणार नाही. त्यासाठी अगोदर ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

PM Kisan Yojana 24th installment: देशातील कोट्यवधी अल्पभूधारक शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 24 व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. केंद्र सरकार या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. तीन हप्त्यात प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येतात. हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरीत करण्यात येतो. 20 जून 2026 रोजी सरकारने 23 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. त्यानंतर या महिन्यात हा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण त्यापूर्वी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
e-KYC प्रक्रिया पूर्ण करा
कृषी मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, सर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांना e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या योजनेसाठी अधिकृतरित्या संबंधित पोर्टलवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत KYC अपडेट केलेले नाही. तोपर्यंत 24 वा हप्ता जमा करण्यात येणार नाही.
शेतकरी हप्त्याची प्रक्रिया दोन पद्धतीने अगदी सहजरित्या पूर्ण करू शकतात. या योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ओटीपी बेस्ड ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येते. अथवा जवळच्या महा ई सेवा केंद्रावर जाऊन बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन प्रक्रियेद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करता येते.
बँक खाते आधार कार्डशी लिंक आणि डीबीटी सक्रीय करा
योजनेतंर्गत लाभाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. त्यासाठी बँक खाते सक्रीय असणे आवश्यक आहे. बँक खाते आधार क्रमाकांशी लिंक असणे आवश्यक आहे. याशिवाय खात्यातील DBT सेवा वा NPCI मॅपिंग करणे आवश्यक आहे. अनेकदा बँक खात्याशी काही तांत्रिक अडचण असेल तर ती दूर होते. खात्याची माहिती होते. जर ही प्रक्रिया केली नाही तर सरकारचा हप्ता परत जातो.
पीएम किसानसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक आहे. या डिजिटल प्रणालीत प्रत्येक शेतकर्याला एक युनिक फार्मर आयडी दिला जातो. शेतीसंबंधीत योजना, पीक विमा आणि अनुदानाचा थेट लाभ मिळण्यासाठी ही नोंदणी बंधनकारक आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसीसोबतच ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक आहे.
ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी ही कागदपत्रे आवश्यक
आधार कार्ड, तुमच्या मोबाईल क्रमाकांशी संलग्नित
जमिनीचा 7/12 उतारा, 8-अ
बँक पासबुक गरजेचे
तर मग अडकू शकतो हप्ता
ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर शेतकऱ्यांना पीएम किसानचा नवीन हप्ता मिळणार नाही. शेतकऱ्यांनी वेळेपूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. सोबतच शेतजमिनीचा पडताळा, आधार लिकिंग आणि दस्तावेजातील नावातील चूक हे लागलीच दुरूस्त करणे आवश्यक आहे.