PM Kisan Yojana : आनंदवार्ता, या दिवशी पीएम किसानचा जमा होणार 20 वा हप्ता, पण यादीत तुमचे नाव आहे की नाही?

PM Kisan Scheme 20th Installment : पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता लवकरच शेतकर्‍यांना मिळणार आहे. यापूर्वी 19 वा हप्ता जमा करण्यात आला आहे. आता हा हप्ता कधी जमा होणार याची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.

PM Kisan Yojana : आनंदवार्ता, या दिवशी पीएम किसानचा जमा होणार 20 वा हप्ता, पण यादीत तुमचे नाव आहे की नाही?
20 वा हप्ता केव्हा मिळणार?
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 03, 2025 | 10:59 AM

केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकर्‍यांसाठी अनेक योजना राबवण्यात येतात. त्यामाध्यमातून शेतकऱ्यांना थोडी आर्थिक मदत करण्यात येते. केंद्र सरकारची पंतप्रधान किसान योजना शेतकर्‍यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. या योजनेत हप्त्याची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. 2019 पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामाध्यमातून देशभरातली कोट्यवधी शेतकर्‍यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये जमा होत आहेत.

दरवर्षी 6 हजार रुपये जमा

या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होतो. या योजनेतंर्गत त्यांच्या खात्यात दरवर्षी तीन हप्त्यात प्रत्येकी 2-2-2हजार रुपये जमा करण्यात येतात. शेतकऱ्यांना प्रत्येकी वर्षी 6 हजार रुपये जमा करण्यात येतात. शेतकरी सन्मान योजनेतंर्गत आतापर्यंत 19 हप्ते जमा करण्यात आले आहे. तर आता 20 वा हप्ता सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

20 वा हप्ता कधी जमा होणार

पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत 20 वा हप्ता लवकरच जमा होईल. आतापर्यंत या योजनेत 19 हप्ते शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होतील. केंद्र सरकार दर चार वर्षानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसा जमा करते. प्रत्येकी 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यापूर्वी 18 वा हप्ता हा ऑक्टोबर 2024 मध्ये जमा करण्यात आला होता. हा पॅटर्न लक्षात घेता 20 वा हप्ता हा जून 2025 च्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे. अजून केंद्र सरकारने याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही.

कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ

पीएम किसान योजनेतंर्गत नियमात अजून एक मोठा बदल करण्यात आला आहे. या नवीन नियमानुसार, कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असतील तर एकालाच लाभ घेता येणार आहे. इतर सदस्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली समोर आली आहे. यामध्ये लाभार्थ्यांविषयीच्या नियमात बदल झाले आहेत.

तुमचे नाव यादीत आहे का?

पीएम किसान योजनेचा यापूर्वी लाभ मिळाला असेल तर यावेळी लाभ मिळेल की नाही, यासाठी लाभार्थी यादी तपासावी लागेल. शेतकरी त्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही, हे तपासू शकतात. शेतकरी सरकारची अधिकृत साईट pmkisan.gov.in वर जाऊन त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही ते तपासू शकतात.