AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Yojana: लवकरच मिळणार 21 वा हप्ता, त्याआधी ही 3 कामे करा, अन्यथा पैसे मिळणार नाहीत…

पीएम किसान योजनेच्या माध्यमातून गरजू शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले जातात. दर तीन महिन्यांना या योजनेच्या दोन हजार रुपयांचा हप्ता मिळत असतो.

PM Kisan Yojana: लवकरच मिळणार 21 वा हप्ता, त्याआधी ही 3 कामे करा, अन्यथा पैसे मिळणार नाहीत...
| Updated on: Oct 21, 2025 | 9:06 PM
Share

देशभरातील लाखो शेतकरी दिवाळीच्या आधीपासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहात होते. परंतू अजूनही २१ वा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यानी छठ पूजेच्या आधी जारी होऊ शकते असे म्हटले जात आहे. काही नैसर्गिक संकटे आलेल्या राज्यात २१ वा हप्ता आधीच जारी केलेला आहे. पीएम किसान योजना अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांच्यासाठी केंद्र सरकारने आणलेली आहे. दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांना २ हजार रुपयांचा हप्ता या योजनेत मिळतो.

२१ वा हप्ता छठ पूजेपर्यंत येऊ शकतो

काही मीडिया रिपोर्ट्स नुसार २१ वा हप्ता येत्या छठपूजेपर्यंत येऊ शकतो. तर काही बातम्यांनुसार हा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो. बिहार येथे निवडणूकांचे वातावरण पाहाता, हा २१ वा हप्ता आता नोव्हेंबरमध्येच मिळू शकतो असे म्हटले जात आहे.

हप्ता मिळण्यासाठी महत्वाची तीन कामे करा

ई-केवायसी तातडीने करा : जर तुम्ही अजूनपर्यंत ई-केवायसी केलेले नसेल तर लागलीच करुन घ्या. विना केवायसी तुम्हाला २१ वा हप्ता मिळणार नाही. तुम्ही नजिकच्या सीएससी सेंटरवर जाऊन वा अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन ई-केवायसी करु शकता.

भू-सत्यापन करा : शेती योग्य जमिनीची पडताळणी करणे गरजेचे असते. जर तुम्ही भू-पडताळणी केलेली नाही. तर लागलीत जमीनीची पडताळणी करा, कारण लागवडी योग्य जमीनीची पडताळणी करणे अनिर्वाय आहे. त्याशिवाय तुम्हाला तुमचा हप्ता मिळणार नाही.

आधार लिंकिंग अनिवार्य: जर तुम्ही तुमच्या बँक खात्याशी तुमचे आधारकार्ड लिंक केले नसेल तर लागलीच करुन टाकावे,आधार लिंक नसल्याने देखील तुमचा २१ वा हप्ता रखडू शकतो.

काय आहे योजना

देशातील शेतकरी कुटुंबाना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ही पीएम किसान सन्मान योजना सुरु केलेली आहे. पीएम-किसान योजनेंतर्गत केंद्र सरकार डीबीटी अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन समान हप्त्यात वार्षिक ६००० रुपये जमा करते. एका शेतकरी कुटुंबातील केवळ एकाच सदस्याला (पती किंवा पत्नी किंवा अल्पवयीन मुलं) या योजनेचा लाभ घेता येतो.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...